एसबीआय आता देणार स्वस्त ‘बजेट होम’ कर्ज
By Admin | Updated: May 9, 2017 00:08 IST2017-05-09T00:08:32+5:302017-05-09T00:08:32+5:30
परवडणाऱ्या दरातील घर विकत घेणाऱ्या गृहकर्जदारांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्जाचे व्याजदर पाव टक्का घटविले आहेत.

एसबीआय आता देणार स्वस्त ‘बजेट होम’ कर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परवडणाऱ्या दरातील घर विकत घेणाऱ्या गृहकर्जदारांसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने कर्जाचे व्याजदर पाव टक्का घटविले आहेत. ३० लाखांपर्यंत किंमत असलेले घर घेणाऱ्यांना हे नवे दर लागू असतील. महिला ग्राहकांना एसबीआय ८.३५ टक्के दर आकारणार आहे. यामुळे दर महिन्याच्या हप्त्यामध्ये तब्बल ५२९ रुपयांपर्यंत बचत होऊ शकेल. बँकेचे नवे दर इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक कमी आहेत.
पुरुष कर्जदार असल्यास त्याच्यासाठी ३१ जुलैपर्यंत ही योजना लागू असेल. नोकरदार पुरुष गृहखरेदीदारास ०.२० टक्के कमी व्याजदराने कर्ज मिळेल. बिगर नोकरदारांसाठी हे व्याजदर ०.१५ टक्के होतील. म्हणजे नोकरदार वर्गास ८.४० टक्के दराने कर्ज मिळेल, असे एसबीआयचे राष्ट्रीय बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनिश कुमार यांनी सांगितले. या नव्या योजनेची अंमलबजावणी मंगळवारपासून होणार आहे.