शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँकेत हजारो जागांवर भरती; फक्त पदवी हवी, साधा संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:21 PM

sbi recruitment 2021 notification pdf, apply online: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी भरती काढली आहे. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णसंधी आहे.

SBI Clerk Recruitment 2021, Sarkari Naukri 2021: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असताना सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मोठी भरती काढली आहे. बँकेत नोकरीची संधी शोधणाऱ्यांसाठी हा सुवर्णसंधी आहे. एसबीआयने क्लार्कच्या 5237 पदांवर (SBI Clerk Recruitment 2021) भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल 2021 म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आलेली आहे. (SBI Clerk Notification 2021 Out for 5454 Junior Associates Posts.)

एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर याची माहिती आहे. यामध्ये ज्युनिअर असोसिएट या जागा भरल्या जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क भरती 2021 नुसार ज्युनिअर असोसिएटच्या 5237 जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 17 मे 2021 आहे. 

महत्वाच्या तारखा...अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 27 एप्रिल 2021 अर्ज करण्याची अंतिम तारीख - 17 मे 2021परिक्षा पूर्व ट्रेनिंग कॉल लेटर - 26 मे 2021प्रीलिमिनरी परिक्षा - जून 2021मुख्य परिक्षा - 31 जुलै, 2021

शिक्षणाची अटकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवारांकडे 01 जानेवारी 2021 च्या आधीचे integrated dual degree (IDD) प्रमाणपत्र आहे ते अर्ज करू शकतात. तसेच जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत, ते अर्ज करू शकतात. 

वयाची अटएसबीआय भरतीला वयाची अट 1 एप्रिल 2021 नुसार कमीत कमी 20 आणि जास्तितजास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच आरक्षणानुसार वयाची अट शिथिल केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन पहावे लागणार आहे. 

निवड प्रक्रिया...सुरुवातीला एक ऑनलाईन आणि नंतर मुख्य परिक्षा (SBI Preliminary & Main exam) घेण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक भाषेची निवड करता येणार आहे. 100 अंकांची पहिली परिक्षा असणार आहे. एक तासाची ही परिक्षा असणार असून इंग्रजी, गणित आणि तर्क क्षमतेवर आधारित असणार आहे. 

अर्ज शुल्कभरतीचे अर्ज शुल्क सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आरक्षणातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

SBI Clerk Recruitment 2021 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाgovernment jobs updateसरकारी नोकरीbankबँक