शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी नदीत उतरली महिला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:34 IST

Women inter into river Ganga for Jalasamadhi: एका महिलेने गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी गंगा नदीमध्ये प्रवेश केला.

रांची - झारखंडमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी गंगा नदीमध्ये प्रवेश केला. (Women inter into river Ganga for Jalasamadhi) दरम्यान, ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने आसपासच्या भागात पसरली आणि बघत बघता त्या ठिकाणी हजारो लोक जमा झाले. भजन-कीर्तनही सुरू झाले. दरम्यान, या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना समजली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले. मात्र या कारवाईवेळी लोकांकडून विरोध झाला. या महिलेला सोडण्याची मागणी ते करत होते. तसेच त्यासाठी साहिबगंज बाजाराचा मुख्य रस्ताही लोकांनी बंद केला. (Saying that Mata Ganga has been called, the woman went down to the river for Jalasamadhi )

मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना साहिबगंजमधील चानन गावातील आहे. येथील रहिवासी सुदामा रविदास याची पत्नी रीता देवी गिने सोवमारी सकाळी २४ तासांच्या जलसमाधीचा संकल्प घेऊन गंगेमध्ये प्रवेश केला. आपल्याला आईने बोलावले आहे, असा दावा ती करत होती. तसेच मंगळवारी ती गंगेतून सुखरूप बाहेर येईल, असे सांगत होती. तिच्या पतीने सांगितले की, ती गंगेची भक्त आहे. आपल्याला गंगा मातेने बोलावले आहे, असे सांगित्यावर मी तिला घेऊन गंगेच्या किनारी आलो आणि तिथे पूजा सुरू केली, असे त्याने सांगितले.

या प्रकरणी जिरवाबाडी ओपीचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तसेच गंगा नदीला उधाण आलेले आहे. तिने गंगेत जलसमाधीसाठी प्रवेश केला होता. मानवी जीवनाचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. या लोकांचीही समजूत घालण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :JharkhandझारखंडIndiaभारत