म्हणे, निर्भया घटना छोटी !
By Admin | Updated: August 23, 2014 02:13 IST2014-08-23T02:13:47+5:302014-08-23T02:13:47+5:30
राज्य पर्यटन मंत्रलयाच्या वार्षिक परिषदेत गुरुवारी बोलताना जेटली यांनी निर्भया प्रकरणाचा उल्लेख ‘छोटी घटना’ असा केला.

म्हणे, निर्भया घटना छोटी !
नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया बलात्काराच्या एका छोटय़ा घटनेला जगभरात प्रसिद्धी मिळाल्याने पर्यटन क्षेत्रत भारताला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला, असे वक्तव्य केल्याने अर्थमंत्री अरुण जेटलींवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याचे लक्षात येताच शुक्रवारी जेटलींनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा खुलासा करीत खेद व्यक्त केला.
राज्य पर्यटन मंत्रलयाच्या वार्षिक परिषदेत गुरुवारी बोलताना जेटली यांनी निर्भया प्रकरणाचा उल्लेख ‘छोटी घटना’ असा केला. त्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. निर्भयाची आई आणि विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी जेटलींच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत घडलेल्या एका छोटय़ाशा बलात्कार प्रकरणाला जगभरात पोहोचवण्यात आले. त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसला. पर्यटक संख्येत घट होऊन सरकारला कोटय़वधी डॉलरच्या महसुलावर पाणी सोडावे लागले, असे विधान जेटली यांनी केले होते.
खेद व्यक्त करतो
बलात्काराच्या घटनेला मला ‘छोटी घटना’ म्हणायचे नव्हते. दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मी लक्ष वेधले होते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. माङया विधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.
- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री