जामनेरातील द्वारका दर्शन पार्क भागात सव्वादोन लाखाची धाडसी चोरी! रविवार १५ रोजी मुलीचे लग्न, त्याआधीच अज्ञात चोरट्यांनी हात मारला!

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:09+5:302015-02-14T23:50:09+5:30

जामनेर- शहरातील द्वारका दर्शन पार्क या पांढरपेशी भागातील एका घरामध्ये शुक्रवार- शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चांगलाच हात मारून लग्नासाठी आणलेले सुमारे सव्वादोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे ज्या घरात चोरी झाली तेथे रविवार (१५) रोजी लग्न होते. लग्नासाठी आणलेले दागिनेच चोरट्यांनी चोरून नेल्याने आ›र्याबरोबर नागरिकांनी रात्रीच्या पोलीस गस्तविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.

Savvaston Lakhaji's stolen theft in the Dwaraka Darshan Park area in Jamnare The girl's wedding on Sunday 15, even before the unknown thieves killed! | जामनेरातील द्वारका दर्शन पार्क भागात सव्वादोन लाखाची धाडसी चोरी! रविवार १५ रोजी मुलीचे लग्न, त्याआधीच अज्ञात चोरट्यांनी हात मारला!

जामनेरातील द्वारका दर्शन पार्क भागात सव्वादोन लाखाची धाडसी चोरी! रविवार १५ रोजी मुलीचे लग्न, त्याआधीच अज्ञात चोरट्यांनी हात मारला!

मनेर- शहरातील द्वारका दर्शन पार्क या पांढरपेशी भागातील एका घरामध्ये शुक्रवार- शनिवार दरम्यानच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चांगलाच हात मारून लग्नासाठी आणलेले सुमारे सव्वादोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २५ हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे ज्या घरात चोरी झाली तेथे रविवार (१५) रोजी लग्न होते. लग्नासाठी आणलेले दागिनेच चोरट्यांनी चोरून नेल्याने आ›र्याबरोबर नागरिकांनी रात्रीच्या पोलीस गस्तविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली.
घरात लग्नाची धामधूम आणि चोरी....
फिर्यादी इंदूबाई प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे त्यांच्या मुलीचे रविवारीच लग्न असल्याने घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ तशी चार-पाच दिवसांपासूनच होती. दोन दिवसांवर लग्न असल्याने घरात लग्नाच्या तयारीला वेग आला होता. रात्रीचे विविध कार्यक्रमही रात्री १ ते २ वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी झोपी गेल्याचे सांगण्यात येते. पण लग्नघरातील पाहुण्यांच्या वर्दळीचा फायदा बाहेरचा अज्ञात चोरटा कसा घेईल? अशीही शंका या वेळी व्यक्त होत आहे. घराच्या जिन्यावरून घरात प्रवेश केल्यानंतर गोदरेजच्या कपाटातून चोरट्यांनी मंगलपोत, चैन, अंगठी, कानातील डुल आदी चांदीचेही दागिने व २५ हजार रुपये लंपास केले आणि कपाटातून अज्ञात चोरट्यांनी बरोबर घेतलेले काही किरकोळ सामान इतरस्त: फेकून दिले. पोलीस निरीक्षक रफीक शेख यांनी घटनेची माहिती घेतली आणि चोरी झाल्याचा पंचनामा केला.

जामनेर- चोरी झालेल्या घरातील फोडलेले कपाट व फेकलेल्या वस्तू.

Web Title: Savvaston Lakhaji's stolen theft in the Dwaraka Darshan Park area in Jamnare The girl's wedding on Sunday 15, even before the unknown thieves killed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.