शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:03 IST

एका पुस्तक कार्यक्रमात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सावरकर आणि जिन्ना यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे. 

नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांबद्दल कर्नाटकमधील आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान समोर आले आहे. वीर सावरकर हे ब्राह्मण होते, परंतु गोमांस खायचे, त्यांनी कधीही गोहत्येचा विरोध केला नाही असं आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्याच्या या विधानावरून देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. 

मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, सावरकरांबद्दल लोक असेही बोलतात ते ब्राह्मण होते, मात्र उघडपणे मांस खायचे आणि त्याचा प्रचारही करत होते. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृती परंपरेवर विश्वास ठेवणारे होते, ते कट्टर शाकाहारी होते ते सर्व दृष्टीने लोकशाहीवादी व्यक्ती होते. मोहम्मद अली जिन्नाच्या तुलनेत सावरकर अधिक कट्टरतावादी होते. सावरकरांची विचारधारा वेगळी होती त्यांनी कधी गोहत्येचा विरोध केला नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच सावरकरांची विचारधारा भारतीय संस्कृतीपेक्षा वेगळी होती. आरएसएस,  हिंदू महासभा आणि अन्य कट्टरपंथी समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. लोकांना हे समजून घेण्यासाठी सामाजिक आणि राजकीयदृष्टीने जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. जिन्ना कट्टर मुस्लीम असूनही डुकराचे मांस खात होते. ते कट्टरपंथी नव्हते त्यांना सरकारमध्ये उच्च पद हवं होते, त्यासाठी वेगळ्या देशाची मागणी जिन्नांनी केली असंही दिनेश गुंडुराव यांनी सांगितले.

दरम्यान, गोडसेसारख्या व्यक्तीने महात्मा गांधींची हत्या केली, तो कट्टरपंथी होता कारण आपण जे करतोय ते योग्य असं त्याला वाटत होते हा कट्टरतावाद आहे. समजा, कुणी गोरक्षक जातो, कुणाला मारतो तेव्हा तो चुकतोय असं त्याला वाटत नाही. हा सावरकरांचा कट्टरतावाद धोकादायक आहे. गांधी एक धार्मिक व्यक्ती होते. सावरकरांच्या तुलनेत गांधी लोकशाहीवादी होते असंही दिनेश गुंडूराव यांनी विधान केले. 

भाजपाचा पलटवार 

कर्नाटकातील मंत्री दिनेश गुंडूराव यांच्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपा नेते अनुराग ठाकूर म्हणाले की, काँग्रेस फेक नरेटिव्हची फॅक्टरी आहे. भारत वीर सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही. देशासाठी स्वत:चं जीवन समर्पित करणाऱ्या सावरकरांपासून काँग्रेसने कधी धडा घेतला नाही. देश तोडणाऱ्या काँग्रेस पक्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वात तुकडे तुकडे विचारधारेला प्रोत्साहन दिले आहे. ज्यांनी परदेशात भारताची बदनामी केली असं ठाकूर यांनी म्हटलं. 

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा