शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

JNUतल्या रोडचं नामकरण केलं सावरकर मार्ग; विद्यार्थिनी म्हणे, युनिव्हर्सिटीत त्यांना जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 13:09 IST

गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला या रस्त्याचं नाव वी. डी. सावरकर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचदरम्यान हॉस्टेलमधल्या फीवाढीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 

ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU Campus)च्या रस्त्याचं नाव बदलण्यात आलं आहे. JNUतल्या या रोडचं नाव आता विनायक दामोदर सावरकर रोड करण्यात आलं आहे. सावरकर हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात.जेएनयू छात्रसंघाची अध्यक्षा आयशी घोषनं याचा निषेध नोंदवला आहे. जेएनयू कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.

नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU Campus)च्या रस्त्याचं नाव बदलण्यात आलं आहे. JNUतल्या या रोडचं नाव आता विनायक दामोदर सावरकर रोड करण्यात आलं आहे. सावरकर हिंदुत्वावादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात. जेएनयू छात्रसंघाची अध्यक्षा आयशी घोषनं याचा निषेध नोंदवला आहे. जेएनयू कार्यकारी परिषदेच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला या रस्त्याचं नाव वी. डी. सावरकर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचदरम्यान हॉस्टेलमधल्या फीवाढीचाही प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जेएनयू रोडला गुरु रविदास मार्ग, राणी अब्बाका मार्ग, अब्दुल हामिद मार्ग, महर्षि वाल्मिकी मार्ग, राणी झांसी मार्ग, वीर शिवाजी मार्ग, महाराणा प्रताप मार्ग आणि सरदार पटेल मार्ग अशा नावांचाही पर्याय देण्यात आला होता. या सर्व नावांवर विचारविनिमय केल्यानंतर जेएनयू कार्यकारी परिषदेनं वी. डी. सावरकर मार्गाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. जेएनयू छात्रसंघाच्या अध्यक्ष आयशी घोष हिनं रस्त्याचं नाव सावरकर मार्ग ठेवण्याला लाजिरवाणी घटना म्हटलं आहे. आयशीनं ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुबनसीर हॉस्टेलला जाणाऱ्या रस्त्याला वी. डी. सावरकर मार्ग नाव देण्यात आलं आहे. आयशी घोषनं ट्विट करत म्हटलं आहे की, जेएनयू विश्वविद्यालयाच्या रस्त्याला एका व्यक्तीचं नाव देण्यात आलं आहे. सावरकर आणि त्यांच्या लोकांना विश्वविद्यालयाच्या जवळपास कधीही जागा नव्हती आणि भविष्यातही नसेल. या प्रकरणात जेएनयू रजिस्ट्रारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही, असंही आयशी घोष हिनं सांगितलं आहे. गेल्या वर्षी दिल्ली युनिव्हर्सिटीत विनायक दामोदर सावरकरांची मूर्ती लावण्यावरूनही गोंधळ झाला होता. तत्कालीन छात्रसंघाचे अध्यक्ष शक्ति सिंह यांनी कोणतीही परवानगी न घेता कॅम्पसमधल्या गेटवर वी. डी. सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंह यांच्या प्रतिमा लावल्या होत्या. त्यानंतर छात्र संघटनेनं यावर आक्षेप घेतला. काही जणांनी सावरकर यांच्या प्रतिमेला काळी शाही फासली होती. त्यानंतर मोठा गदारोळ झाल्यानंतर ती प्रतिमा तिथून हटवण्यात आली होती.  

टॅग्स :jnu - jawaharlal nehru universityजेएनयूVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर