शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी करून कसलाही गुन्हा केला नाही; राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 12:16 IST

डोटासरा म्हणाले, दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. (Savarkar did not commit any crime by demanding a hindu rashtra )

जयपूर - राजस्थानचे शिक्षण मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी सोमवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Savarkar did not commit any crime by demanding a hindu rashtra Says Rajasthan congress chief govind singh dotasra)

डोटासरा म्हणाले, दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. सावरकर देशासाठी तुरुंगातही गेले. सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी करून कोणताही गुन्हा केला नाही, उलट त्यांची ही मागणी न्याय्यच होती, सावरकरांच्या अनेक मागण्या योग्य होत्या. मात्र, त्यांच्या विचारधारेवर लोकांचा आक्षेप होता, असेही डोटासरा म्हणाले. ते ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. 

कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी विरोधकांची डिनर डिप्लोमसी, गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्वावर पुन्हा उपस्थित केले प्रश्नचिन्ह

डोटासरा म्हणाले, सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. ते हिंदू राष्ट्राबद्दल बोलत होते, जे चुकीचे नव्हते, कारण त्यावेळी आपला देश स्वतंत्र नव्हता आणि आपले संविधान बनलेले नव्हते. मात्र, जेव्हा आपले संविधान बनवले गेले, तेव्हा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सर्व धर्म स्वीकारले गेले. यानंतर, भाजप आणि आरएसएसने त्यांची विचारधारा  भावांमध्ये वैर निर्माण करण्यासाठी वापरली आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत.

काँग्रेस नेत्याच्या तोंडून सत्य बाहेर आलंच -डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी, माजी मंत्री यूनुस खान आणि आमदार अशोक लाहोटी यांनी म्हटले आहे, की अखेर काँग्रेस नेत्यांच्या तोंडी सत्य आलंच. ते म्हणाले, सावरकर आमचे मार्गदर्शक होते, आहेत आणि सदैव राहतील.

"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRajasthanराजस्थान