शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 17:26 IST

Saurabh Bharadwaj And BJP : आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. राजधानीत सणासुदीच्या काळात सुरू असलेली गुन्हेगारी, हिंसा, गँगवॉर रोखण्यात भाजपा अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. सौरभ भारद्वाज म्हणाले, "आजकाल संपूर्ण देशभरात सणांचं वातावरण आहे आणि येत्या महिनाभरात देशात अनेक सण साजरे केले जातील."

"बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पण आज बाजारात जाताना लोकांच्या मनात एक भीती असते की, केव्हापण गँगवॉर सुरू होईल आणि गोळ्या झाडल्या जातील, स्फोट होतील, गुंड कधी कुणाच्या घरात घुसून मारतील... त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सर्व यंत्रणा चालवण्याची जबाबदारी, दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रात बसलेल्या भाजपा सरकारची आहे."

"केंद्रात बसलेलं भाजपा सरकार दिल्ली या छोट्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळू शकत नाही. ते देशाच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था कशी सांभाळणार आहेत? दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि या राजधानीत पंतप्रधानांचं निवासस्थान आहे, राष्ट्रपतींचं निवासस्थान आहे, सर्व मंत्रालयं येथे आहेत, संसद भवन येथे आहे, सर्वोच्च न्यायालय येथे आहे. दिल्ली, सीबीआय, एसीबी, एनएसजी, दिल्ली पोलिसांचे मुख्यालय, सर्व मोठ्या सुरक्षा संस्था आणि सरकारचे विभाग दिल्लीत आहेत आणि हे सर्व असूनही, गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या आज दिल्लीत सक्रिय आहेत."

"आज दिल्लीची स्थिती अशी आहे की, मिठाईच्या दुकानांमध्ये गोळ्या झाडल्या जात आहेत, कारच्या शोरूममध्ये गोळ्या झाडल्या जात आहेत, ग्रेटर कैलासमधील जिमच्या बाहेर वेलकम कॉलनीत रस्त्यावर खुलेआम ६० राउंड गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मालकाची हत्या, रोहिणीतील एका दाम्पत्याच्या घरात घुसून ५ कोटी रुपये लुटले. रोज उघडपणे गुन्हे घडत असतात" असंही देखील सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी