शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्य योजनेमुळे राज्यात १५.१८ लाख घरांना वीज, ३०५०० पेक्षा जास्त घरे सौरऊर्जेने उजळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 11:57 IST

Saubhagya Yojana : महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली गेली आहे. 

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : प्रत्येक घरी वीज पोहोचविण्यासाठी सुरू केल्या गेलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान सहज बिजली हर घर योजनेतून महाराष्ट्रात १५.१८ लाख कुटुंबांना जोडणी दिली गेली आहे. यातील ३०,५०० पेक्षा जास्त घरे जेथे पारंपरिक वीज पोहोचणे कठीण होते, ती घरे सौरऊर्जेने उजळून निघाली आहेत. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार राज्यात सौरऊर्जेने उजळून निघालेल्या घरांत सर्वाधिक २२,६३३ घरे नंदूरबारमध्ये आणि ३,७२१ घरे अमरावतीत आहेत. धुळ्यात १,०६५, गडचिरोलीत ८५५ आणि जलगावात ७०७ घरांपर्यंत सौरऊर्जेने वीज पोहोचविली गेली आहे.महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली गेली आहे. 

महाराष्ट्रात सौरऊर्जेने उजळलेली घरेजिल्हा            जोडणीनंदूरबार -             २२,६३३अमरावती -      ३,७२१धुळे -              १,०६५गडचिरोली     -        ८५५जळगाव -        ७०७अखिल महाराष्ट्र - ३०,५३८ 

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार