Satyendra Das Death: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी लखनौ पीजीआय येथे अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे.
जगातील सर्वात भ्रष्ट देशांची यादी झाली प्रसिद्ध, हे देश सर्वात भ्रष्ट, भारत या क्रमांकावर
सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराची सेवा केली. फेब्रुवारी १९९२ मध्ये, जेव्हा 'वादग्रस्त जमिनी'मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली.
१९९२ मध्ये त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत होता. २०१८ पर्यंत सत्येंद्र दास यांचा पगार फक्त १२ हजार रुपये दरमहा होता. २०१९ मध्ये, अयोध्या आयुक्तांच्या सूचनेनुसार, त्यांचे वेतन १३,००० रुपये करण्यात आले. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती. यानंतर, १९७६ मध्ये, त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली.