चांदसरच्या एकास खुनाच्या गुन्ात सक्तमजुरी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : मार्च २०१४ मध्ये मस्करीतून झालेल्या वादात केला होता खून
By admin | Updated: March 15, 2016 00:32 IST
जळगाव : मस्करीतून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात लाकडी शिंगाडे मारून त्याला जीवे ठार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने चांदसर (ता.धरणगाव) येथील भुंग्या मोतीलाल भिल या आरोपीस सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
चांदसरच्या एकास खुनाच्या गुन्ात सक्तमजुरी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : मार्च २०१४ मध्ये मस्करीतून झालेल्या वादात केला होता खून
जळगाव : मस्करीतून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात लाकडी शिंगाडे मारून त्याला जीवे ठार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने चांदसर (ता.धरणगाव) येथील भुंग्या मोतीलाल भिल या आरोपीस सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात हकिकत अशी, चांदसर येथील झिंगा गजमल भिल व आरोपी भुंग्या भिल यांच्यात ९ मार्च २०१४ रोजी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास चांदसर गावातील राम मंदिरासमोर मस्करीमुळे आपापसात भांडण झाले होते. या वादात भुंग्या याने झिंगाला शिवीगाळ, दमदाटी करीत त्याच्या डोक्यात बैलगाडीचे लाकडी शिंगाडे मारले होते. शिंगाड्याचा मार लागल्याने झिंगाच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला होता. या घटनेनंतर गावातील भिला भिल याने झिंगाचा भाऊ आत्माराम भिल यांना घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर आत्माराम यांनी भुंग्याविरुद्ध पाळधी दूरक्षेत्रात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ५०४, ५०६ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.दहा साक्षीदार तपासलेया घटनेचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. पाटील यांनी करून आरोपी भुंग्याविरुद्ध ९ जून २०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर यांच्या न्यायालयात चालला. त्यात सरकार पक्षातर्फे ॲड.गोपाळ जळमकर यांनी फिर्यादी आत्माराम भिल, प्रत्यक्ष साक्षीदार गोकूळ गायकवाड, सुनील धनगर, डॉ.रती अत्तरदे, तपासाधिकारी एस.एन. पाटील यांच्यासह एकूण दहा साक्षीदार तपासले होते. सरकारी वकिलांनी केलेला प्रभावी युक्तिवाद व परिस्थितीजन्य पुरावे ग्रा धरत आरोपी भुंग्याला भादंवि कलम ३०२ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, भादंवि कलम ५०४ व ५०६ अन्वये प्रत्येकी ३ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे ॲड.एस.के. कौल यांनी कामकाज पाहिले.