सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: June 1, 2014 00:32 IST2014-06-01T00:32:03+5:302014-06-01T00:32:03+5:30

फोटो

Satish Chavan's nomination papers | सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

टो
३१ औरंगाबाद या नावाने पाठविण्यात आला आहे़
फोटो ओळ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज शनिवारी दाखल करण्यात आला. यावेळी राज्याच्या शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, आ. चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आ. विक्रम काळे, आ. अमरसिंह राजूरकर.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सतीश चव्हाण यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी, निघालेल्या रॅलीत मराठवाड्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले शेकडो पदवीधर मतदार सहभागी झाले होते.
क्रांतीचौक येथून सकाळी ११ वाजता सतीश चव्हाण यांच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत उमेदवार सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री फौजिया खान, आ. कल्याण काळे, आ. अब्दुल सत्तार, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड आदी नेते रॅलीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Satish Chavan's nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.