धोकादायक कृत्रिम सरोवरातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न; घटनास्थळी तुकड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 06:23 AM2021-02-13T06:23:29+5:302021-02-13T07:55:43+5:30

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर मंडळी या सरोवरातील पाणी भगदाड पाडून काढून देता येईल का या प्रयत्नांत आहेत.

Satellite Pics Show Dangerous Lake Formed By Uttarakhand Avalanche | धोकादायक कृत्रिम सरोवरातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न; घटनास्थळी तुकड्या दाखल

धोकादायक कृत्रिम सरोवरातून पाणी काढून देण्याचा प्रयत्न; घटनास्थळी तुकड्या दाखल

Next

नवी दिल्ली : हिमकडा सात फेब्रुवारीला कोसळून जो मलबा तयार झाला त्यातून बनलेल्या ‘धोकादायक’ अशा सरोवराचे नेमके ठिकाण हाय रिझोल्युशन उपग्रहाच्या प्रतिमांनी शोधून काढले आहे. या हिमकड्याने काही लोकांचा मृत्यू झाला असून २०० जण अजूनही बेपत्ता आहेत. 

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) शास्त्रज्ञ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि इतर मंडळी या सरोवरातील पाणी भगदाड पाडून काढून देता येईल का या प्रयत्नांत आहेत. परिस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी तुकड्या सरोवराच्या दिशेने आधीच निघाल्या आहेत. शुक्रवारी सकाळी तुकड्या त्या भागांत हेलिकॉप्टर्समधून गेल्या. 

ड्रोन्स, मानवरहित विमाने, संबंधित संस्था नेमकी परिस्थिती काय आहे याची पाहणी करीत आहेत, असे एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितले. प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करता येईल, असे प्रधान म्हणाले.

सरोवर फुटबॉल मैदानाच्या तीनपट
या कृत्रिम सरोवराचे व्हिडिओज हेलिकॉप्टर्सनी घेतले आहेत. हा सरोवर फुटबॉल खेळाच्या मैदानाच्या आकाराच्या तीनपट आहे. 
उपग्रहाच्या प्रतिमांतून हे दिसते की, ऋषी गंगा नदीवर खड्डा पडला असून तो खूप वेगाने वाहणाऱ्या रोनती नदीच्या पाण्याने भरून गेला आहे. 
ऋषी गंगा ही त्यामुळे तपोवन वीज प्रकल्पाच्या दिशेने वाहत आहे. हिमनगाचा काही भाग तुटून नदीत पडला.
त्याने मोठे दगड, मलबा व फार मोठ्या प्रमाणात गाळ वाहून सोबत नेला व त्यामुळे दोन वीज प्रकल्प वाहून गेले. 
वाढलेले पाणी आणि मलब्यामुळे तयार झालेली भिंत काळजीचे कारण आहे. पाण्याच्या वजनामुळे भिंतीचे तुकडे होऊन दुसरा पूर येतो का हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय आहे.

Web Title: Satellite Pics Show Dangerous Lake Formed By Uttarakhand Avalanche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.