नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची तयारी सातारा-देवळाई : आता निवडणूक आचारसंहितेची प्रतीक्षा
By admin | Updated: April 15, 2015 00:03 IST
औरंगाबाद : राज्यातील विविध नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर केले. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, निवडणुकीसाठी आचारसंहितेची प्रतीक्षा केली जात आहे.
नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची तयारी सातारा-देवळाई : आता निवडणूक आचारसंहितेची प्रतीक्षा
औरंगाबाद : राज्यातील विविध नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोमवारी जाहीर केले. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून, निवडणुकीसाठी आचारसंहितेची प्रतीक्षा केली जात आहे.सातारा-देवळाई नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आरक्षणाची प्रभाग रचनेची प्रक्रिया पार पडली. करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर आक्षेप, हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. यानुसार आलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर नगर परिषदेची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली. यामध्ये नगर परिषदेतील वॉर्डांची संख्या, त्यांच्या रचना, आरक्षण आदींचा समावेश आहे. यानुसार नगर परिषदेत २५ वॉर्डांचाच समावेश राहणार आहे. सातारा-देवळाईच्या नगराध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यादृष्टीने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. शिवाय नगराध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी परिसरातील कोणता उमेदवार योग्य ठरेल, याचाही कानोसा घेतला जात आहे. नगराध्यक्षपदासाठी आपण कसे योग्य आहोत, हे दर्शविण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.लवकरच आचारसंहितानगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता कधी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आता निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहितेचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच आचारसंहिता लागेल, असे अधिकार्यांंकडून सांगितले जात आहे.