सरसंघचालक मोहन भागवत यांना माओवाद्यांकडून मिळाली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 08:02 IST2023-02-09T08:01:38+5:302023-02-09T08:02:48+5:30
वरिष्ठ पोलिस अधीक्षक आनंदकुमार व उपजिल्हाधिकारी धनंजयकुमार यांनी सरसंघचालकांना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

सरसंघचालक मोहन भागवत यांना माओवाद्यांकडून मिळाली धमकी
भागलपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे शुक्रवारी (दि.१०) बिहारमधील भागलपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांना आयएसआय, माओवादी तसेच मूलतत्त्ववादी प्रवृत्तींकडून धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भागलपूरमधील पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून भागवत यांच्या दौऱ्यात कडक सुरक्षा असणार आहे.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक आनंदकुमार व उपजिल्हाधिकारी धनंजयकुमार यांनी सरसंघचालकांना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.