शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयींचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:23 IST

या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल. उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अनेक योजनांची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली आहे. या मार्गाचे नाव आत अटल पथ असे करण्यात येईल. उत्तर प्रदेशात योगी सरकारने वाजपेयी यांच्या स्मरणार्थ अनेक योजनांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यापुर्वीच उत्तर प्रदेशातील काही योजना अटलजींच्या नावाने राबविण्याचे जाहीर केल्याचे उत्तर प्रदेशचे परविहन मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी स्पष्ट केले. त्यानुसार राज्य सरकार अधिसूचनाही जाहीर करणार आहे. बुंदेलखंड एक्स्प्रेस मार्ग 289 किमी लांबीचा चार पदरी असेल. तो झाशीपासून चित्रकूट, बांदा, हमिरपूर, औरेया व जालौंन पर्यंत जाईल. त्यानंतर इटावामार्गे आग्रा-लखनौ मार्गाला जोडला जाईल. वाजपेयी यांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथ यांनी वाजपेयी यांचे आग्रा, लखनौ, कानपूर, बलरामपूर येथे स्मारक करण्याची घोषणा केली होती.

छत्तीसगडच्या राजधानीचे नाव 'अटल नगर' छत्तीसगडने आपल्या नव्या राजधानीला अटलजींचे नाव देण्याची काल घोषणा केली आहे. या राजधानीचे नाव आता 'अटलनगर' असे करण्यात येणार आहे.1998 साली अणूचाचणी यशस्वी करण्यामध्ये वाजपेयी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल 'छत्तीसगड आर्म्ड फोर्सेस' (सीएएफ) बटालियनला पोखरण बटालियन असे नाव देण्यात येणार आहे.छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. छत्तीसगडची नव्याने बांधलेली राजधानी नया रायपूरमध्ये वाजपेयी यांचा पुतळा उभा केला जाणार असून सर्व 27 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटलजींचा पुतळा व एका सेंट्रल पार्कची निर्मिती केली जाणार आहे अशी घोषणा रमणसिंह यांनी केली आहे. नया रायपूर हे मूळ रायपूरच्या आग्नेयेस 20 किमी अंतरावर आहे.बिलासपूर विद्यापिठाला वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार असून राजनांदगाव येथे बांधण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला, जांगिर चम्पा जिल्ह्यातील मारवा औष्णिक प्रकल्प व रायपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एक्स्प्रेस मार्गालाही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ