शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आता ममता बॅनर्जी चौकशीच्या जाळ्यात शारदा घोटाळा : सीबीआयने चालविली चाचपणी

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

नबीन सिन्हा/नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे बडे नेते अडकल्याचे पाहता सीबीआयने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. छाप्यांमध्ये आढळलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आणि या पक्षाचे आरोपी नेते माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी पुरविलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ममतांचा जाबजबाब घेण्याची योजना सीबीआयने आखली आहे.

नबीन सिन्हा/नवी दिल्ली : कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे बडे नेते अडकल्याचे पाहता सीबीआयने प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मोर्चा वळविला आहे. छाप्यांमध्ये आढळलेले आक्षेपार्ह दस्तऐवज आणि या पक्षाचे आरोपी नेते माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी पुरविलेल्या कागदपत्रांच्या आधारावर ममतांचा जाबजबाब घेण्याची योजना सीबीआयने आखली आहे.
शारदा फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष सुदीप्तो सेन यांचा ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेला थेट संबंध पाहता आवश्यकता भासल्यास पुढील आठवड्यात ममता बॅनर्जी यांचा जबाब नोंदला जाऊ शकतो, असे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. माजी खासदार श्रींजॉय बोस यांना सीबीआयने समन्स पाठविला असून मुकल रॉय यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते. शारदा कंपनीशी संबंध असलेल्या रोझ व्हॅली रियल्टी या समूहावर सीबीआयची नजर आहे.
--------------
आणखी मंत्रीही रडारवर
तृणमूल काँग्रेसचे आणखी चार मंत्र्यांचा शारदा घोटाळ्याशी थेट संबंध असून त्यांना समन्स पाठविण्याची तयारी सीबीआयने केली आहे. सीबीआयने आतापर्यंत प. बंगाल आणि ओडिशामध्ये किमान ५० प्रकरणांची नोंद केली आहे. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटींच्या घरात असून एकट्या शारदा समूहाने त्यापैकी १० हजार कोटी हडप केले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासह त्यांचे मदतनीस गौतम सन्याल आणि रतन मुखर्जी यांनाही पाचारण केले जाऊ शकते.
------------
अनिल गोस्वामींची चौकशी होणार
माजी केंद्रीय मंत्री मतंगसिंग यांच्याशी असलेल्या संबंधावरून माजी गृहसचिव अनिल गोस्वामी यांची चौकशी केली जाऊ शकते. मतंगसिंग यांच्याशी असलेल्या जवळीकतेच्या आधारावर शारदा घोटाळा दडपण्यासाठी गोस्वामी यांनी बँक आणि अन्य संस्थांवर प्रभाव पाडला काय, याचा तपास सीबीआय करीत आहे.