शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेड लाईट एरियात गेला, महिलेला छेडले; नंतर डॉक्टरसोबत...; संजय रॉयचे हादरवून टाकणारे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 11:15 IST

Sanjay Roy polygraph test: कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेची बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपी संजय रॉयने पॉलिग्राफी टेस्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

Kolkata Rape Case Latest: कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीने पॉलिग्राफी चाचणीमध्ये खळबळ उडवून देणारे अनेक खुलासे केले आहेत. महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यापूर्वी आरोपीने त्या रात्री काय काय केले, याचा सगळा घटनाक्रमही या चाचणीतून समोर आला आहे. आर.जी. कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जाण्यापूर्वी रस्त्यावर एका महिलेची छेड काढली होती, याचीही कबुली आरोपीने दिली आहे. 

कोलकातातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून, आरोपीच्या चौकशीतून दररोज नवीन माहिती समोर येत आहे. 

रुग्णालयात जाण्यापूर्वी संजय रॉय कुठे कुठे फिरला?

आरोपी संजय रॉयची पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली. यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रात्री आरोपीने डॉक्टर महिलेची बलात्कार करून हत्या केली. त्यापूर्वी त्याने एका महिलेचीही छेड काढली होती. 

आरोपी संजय रॉयने सांगितले की, 'त्या रात्री मी दोन वेळा रेड लाइट एरियामध्ये गेलो होतो, पण मी शरीर संबंध ठेवले नाही. त्याचबरोबर त्या रात्री मी एका महिलेसोबत छेडछाड केली होती. ती घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेली आहे.'

गर्लफ्रेंडला म्हणाला, 'न्यूड फोटो पाठव'

आरोपी रॉयने पॉलिग्राफी टेस्ट चौकशीत असेही सांगितले की, डॉक्टरची हत्या केली, त्या रात्री गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल केला होता. तिला न्यूड फोटो पाठव, असेही तो म्हणाला होता. 

८ ऑगस्ट रोजी आरोपी संजय रॉय त्याच्या मित्रासोबत आर.जी. कर रुग्णालयात गेला होता. उपचार घेत असलेल्या त्याच्या मित्राच्या भावाला बघायला ते दोघे गेले होते. 

रात्री ११.१५ वाजता आरोपी संजय रॉय त्याच्या मित्रासोबत रुग्णालयातून बाहेर पडला. त्यानंतर ते दोघे रस्त्यावरच मद्य प्यायले. उत्तर कोलकातामधील सोनगाची रेड लाईट एरियात जाण्याचे त्यांनी ठरवले. 

रॉय आणि त्याचा मित्र नंतर दक्षिण कोलकातातील चेतला रेड लाइट एरियामध्ये गेले. चेतलाला जात असताना त्यांनी रस्त्यात एक महिलेसोबत छेडछाड केली. 

रेड लाइट एरियात संजय रॉयचा मित्र महिलेसोबत गेला. मित्र महिलेसोबत असताना रॉय बाहेर त्याच्या गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्याने तिला न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तिनेही त्याला न्यूड फोटो पाठवले. 

रेड लाइट एरियातून रॉय आणि त्याचा मित्र रात्री आर.जी. कर रुग्णालयात आले. चौथ्या मजल्यावरील ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचले. सकाळी चार वाजता प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर ज्या ठिकाणी झोपली होती, त्या तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलकडे जाताना संजय रॉय गेला. त्यानंतर त्याने हे कृत्य केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालCBIगुन्हा अन्वेषण विभागPoliceपोलिस