शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 10:41 IST

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली-

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. गेल्या चार दिवसांपासून संजय राऊत, नवनीत राणा यांच्यासह एकूण ३० खासदार संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून लडाख दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्तानं दोघंही एकमेकांसमोर येणार का? आणि दोघांमध्ये काही चर्चा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

परराष्ट्र व्यवहार समितीचा दौरा गेल्या चार दिवसांपासून लेह आणि लडाखमध्ये सुरू आहे. यात खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका सदस्याला घेऊन येण्याचीही मूभा असते. त्यामुळे नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा देखील आहे. देशातील एकूण ३० खासदारांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील फक्त तीन खासदार असून यात संजय राऊत, नवनीत राणा आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे. काश्मीरच्या खंडगार वातावरणात खासदार फिरत आहेत. या दौऱ्याच्या निमित्तानं संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यात कितीही हवेदावे किंवा राजकीय वैर असलं तरी अशा कार्यक्रमांमध्ये राजकीय वैर बाजूला सारून संवाद साधण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून संजय राऊत आणि राणा दाम्पत्य यांच्यात चर्चा होणार का हे पाहावं लागेल. 

संजय राऊतांनी वेळोवेळी चीनच्या घुसखोरीवरुन केंद्र सरकारला लक्ष्य करत आले आहेत. त्यात काल या अभ्यास दौऱ्यात खासदारांनी वादग्रस्त पेंगॉंग लेकला भेट देऊन पाहणी केली. संजय राऊत यांनी लेह-लडाख दौऱ्यावेळी उंच पर्वतरांगांचा एक फोटो ट्विट करत लेह-लडाख हा एक अपूर्व संगम आहे...जय महाराष्ट्र! असं म्हटलं होतं. 

लडाखमधून महाराष्ट्रावर 'नजर'संजय राऊत गेल्या चार दिवसांपासून लडाखमध्ये असले तरी त्याचं महाराष्ट्राच्या राजकारणावरही बारीक लक्ष आहे. ट्विटच्या माध्यमातून ते आपली भूमिका मांडत आहेत. राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या सहाव्या जागेसाठीवरुन चढाओढ सुरू असताना राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेचीच असल्याचं एक ट्विट काल संजय राऊत यांनी केलं होतं. शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी दावा ठोकला आहे. तर संभाजी राजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं याआधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काल संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधत राज्यात आता सहाव्या जागेसाठी घोडेबाजार विरोधकांकडून सुरू केला जाईल असा हल्लाबोल केला होता. "महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा त्यातून घोडेबाजार हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणीही कितीही आकडेमोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे", असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBJPभाजपाladakhलडाख