शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्या समोर मुलाला गोळी मारली, मलाही मारतील', IAS अधिकाऱ्याचा व्हिजिलन्सवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:00 IST

भ्रष्टाचाराच्या आरोपात ताब्यात असलेले पंजाबचे वरिष्ठ IAS अधिकारी संजय पोपली यांनी त्यांच्या मुलाचा खून झाल्याचा आरोप केला आहे. व्हिजिलन्सने पोपली यांच्या घरातून 9 सोन्याच्या विटा, 49 बिस्किटे आणि मोठी रोकड जप्त केली.

मोहाली: भ्रष्टाचाराच्या आरोपात ताब्यात असलेले पंजाबचे वरिष्ठ IAS अधिकारी संजय पोपली यांनी त्यांच्या मुलाचा खून झाल्याचा आरोप केला आहे. कार्तिक पोपलीवर व्हिजिलन्स(दक्षता) विभागाने गोळी झाडल्याचा आरोप संजय पोपली यांनी केला आहे. तसेच, आता विजीलंसवाले माझाही खून करतील, असा दावाही त्यांनी केला आहे. पोपलीने मुलाच्या मृत्यूसाठी दक्षता विभागाचे डीएसपी अजय कुमार यांना जबाबदार धरले आहे. आईनेही दक्षताला जबाबदार धरलेसंजय पोपलीच्या पत्नी आणि कार्तिकची आई श्री पोपली यांनीही शनिवारी मुलाच्या मृत्यूसाठी दक्षता जबाबदार धरले. त्यांनी आरोप केला की, दक्षता विभागाने त्यांच्या मुलाला घराच्या वरच्या मजल्यावर नेले, तिथे गोळ्या घालून खून केला. मात्र, व्हिजिलन्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत. डीएसपी अजय कुमार यांनी सांगितले की, त्यांच्या पथकाने छापा टाकला, परंतु कार्तिक पोपलीच्या मृत्यूशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांची टीम परत आल्यानंतर हा प्रकार कळला. ते घराच्या आतही गेले नाहीत. 9 सोन्याच्या विटा, 49 बिस्किटे, रोकड अन्...संजय पोपली यांच्या घरातून व्हिजिलन्स विभागाने 12 किलो सोने जप्त केले आहे. यात एक किलो सोन्याच्या 9 विटा, 49 सोन्याची बिस्किटे, 12 सोन्याची नाणी, तीन किलो चांदीच्या विटांचा समावेश आहे. याशिवाय, चार आयफोन, सॅमसंग फोल्डर फोन, स्मार्ट घड्याळे आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईदरम्यान कार्तिकने स्वत:वर गोळी झाडली, असे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसDeathमृत्यू