ँमुखेडच्या सरपंचपदी संजय पगार
By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:11+5:302015-08-18T21:37:11+5:30
मुखेड- येवला तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत सरपंचपदी संजय दौलत पगार यांची तर उपसरपंचपदी सरला साहेबराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पटेल, तलाठी भुसारे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडीतके यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

ँमुखेडच्या सरपंचपदी संजय पगार
म खेड- येवला तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायत सरपंचपदी संजय दौलत पगार यांची तर उपसरपंचपदी सरला साहेबराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी पटेल, तलाठी भुसारे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडीतके यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, विश्वासराव आहेर, छगन आहेर, रावसाहेब आहेर, रघुनाथ पानसरे, अरुण आहेर, रत्नाकर आहेर, दिलीप आहेर आदिंनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.या निवडीप्रसंगी ग्रा.पं.सदस्य सचिन आहेर, धनंजय आहेर, सुलोचना वाघ, कुसुमबाई गुंड, डॉ.अस्मिता साताळकर, भानुदास आहेर उपस्थित होते. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलाबाची उधळण केली. (वार्ताहर)---