शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
4
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
5
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
6
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
7
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
8
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
9
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
10
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
12
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
13
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
14
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
15
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
16
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
17
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
18
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
19
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
20
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसींचा हैदराबादी किल्ला भेदणार सानिया? बडा पक्ष निवडणूक मैदानात उतरवण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 16:11 IST

खरे तर, काँग्रेसने हैदराबादमध्ये 1980 मध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती. तेव्हा एस नारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.

भारताची दिग्गज टेनिस स्टार सानिया मिर्झा लोकसभा निवडणूक 2024 च्या माध्यमाने राजकारणात एन्ट्री करू शकते. या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात हैदराबादमधून सानियाला उमेदवारी देण्याच्या विचार असल्याचे समजते.

मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (सीईसी) बुधवारी झालेल्या बैठकीत सानिया मिर्झाच्या नावावरही चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसने गोवा, दमण, दीव, तेलंगणा, यूपी आणि झारखंडसाठी 18 उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली होती. यावेळी सानिया मिर्झालाही निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यावर चर्चा झाली.

हैदराबाद शहरातील आपली सैल झालेली पकड सानिया मिर्झाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत पुन्हा एकदा मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असे संबंधित वत्तात म्हणण्यात आले आहे. खरे तर, काँग्रेसने हैदराबादमध्ये 1980 मध्ये शेवटची निवडणूक जिंकली होती. तेव्हा एस नारायण हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. वृत्तानुसार, आता उमेदवारीसाठी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आताचे काँग्रेस नेते मोहम्मद अझहरुद्दीन यांनी सानिया मिर्झाचे नाव सुचवले होते. या दोन्ही खेळाडूंमध्ये कौटुंबिक संबंध आहेत. 2019 मध्ये अझहरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीन याचे लग्न सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्जा सोबत झाले आहे.

हैदराबादच्या जागेसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही जागा गेल्या अनेक वर्षांपासून एआयएमआयएम कडेच आहे. हा त्यांचा गड  मानला जातो. मात्र, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने  ओवेसी यांच्या पक्षाला चांगली टक्कर दिली होती. 1984 मध्ये, सुल्तान सलाहुद्दीन ओवेसी यांनी एक स्वतंत्र उमेदवार म्हणून येथून विजय मिळवला होता. यानंतर त्यांनी 1989 ते 1999 पर्यंत AIMIM चा उमेदवार म्हणून हैदराबादमधून विजय मिळवला होता. त्यांच्यानंतर, असदुद्दीन ओवेसी यांचा 2004 पासून या जागेवर कब्जा आहे. 2019 मध्ये, 14 उमेदवारांनी ओवेसी यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. या निवडणुकीत ओवेसी यांना एकूण 58.94% मतं मिळाली होती. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे, बीआरएसने गद्दाम श्रीनिवास यादव यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा अद्याप केलेली नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sania Mirzaसानिया मिर्झाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी