शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

संघाची संघटना म्हणते ताजमहाल महिलांच्या अपमानाचे प्रतीक, पण कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 21:33 IST

भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे.

नवी दिल्ली - जगभरात प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताजमहालवरून सध्या वाद पेटला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी ताजमहालवरून केलेल्या उलटसुलट वक्तव्यांवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या संघटनेनेही उडी घेतली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ताजमहाल हे महिलांच्या अपमानाचे प्रतीक आहे. मात्र कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास ताजमहाल हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे.अखिल भारतीय इतिहास संघटन योजनेचे संघटना सचिव बालमुकुंद म्हणाले, ताजमहाल हा आमचा ठेवा आहे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे. कलात्मकदृष्ट्या पाहिल्यास ताजमहाल हा आमच्या देशाचा गौरव आहे. जगभरातून त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी लोक येतात. हजारो भारतीय कलाकारांच्या कलेचे त्यातून प्रदर्शन होते. तो आपला ठेवा आहे आणि जर कुणी तसे मानत नसेल तर ते चुकीचे आहे." मात्र कलेचे प्रतीक असला तरी ताजमहाल हा प्रेमाचे प्रतीक मानता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ताजमहाल प्रेमाचे प्रतीक असू शकत नाही कारण एखाद्या महिलेच्या पतीला मारणे, त्यानंतर तिला रखैल म्हणून ठेवणे, पुढे 17 वर्षांत 14 अपत्ये जन्माला घालणे आणि शेवटी 14 व्या अपत्याच्या जन्मावेळी त्या महिलेचा मृत्यू होणे. त्या पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीशी विवाह करणे, हे भारतीय संस्कृतीनुसार प्रेम ठरू शकत नाही. ऐतिहासिकदृष्ट्या हा महिलेचा अपमान आहे. पण कलेचा नमुना म्हणून ताजमहालचा अभिमानच असला पाहिजे.   जगभरातल्या करोडो पर्यटकांची पसंती असलेला ताजमहाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपा आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हा भारतीय इतिहासातला कलंक आहे, असे उद्गार काढले. तर भाजपाचे नेते विनय कटियार यांनी ताजमहाल हे मुळचे शिवमंदीर असून त्याचे नाव तेजोमहाल होते असा दावा केला. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे. तर, काही पुरातत्व तज्ज्ञांनी ताजमहालच्या खाली हजारो खोल्या असल्याचा दावा केला आहे. ताजमहालच्या बाबतीत अनेक बाबी जाणुनबुजून गुप्त ठेवण्यात आल्याचा दावा करणारा व ताजमहाल जेवढा वर आहे, तितकंच बांधकाम त्याच्याखाली आहे असे सांगणारा एक व्हिडीयो सध्याप्रचंड व्हायरल झाला आहे.

प्रत्येक देशातील ऐतिहासिक वास्तूमागे कितीतरी इतिहास लपलेला असतो. हा इतिहास रोमांचकारी असतो तर कधीकधी थक्क करणारा असतो. पण एखाद्या ऐतिहासिक वास्तूमागील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असतेच असं नाही. कधी-कधी राजकीय नेते या गोष्टी सामान्य माणसांपासून मुद्दामहून लपवतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्याचपैकी एक वास्तू म्हणजे भारताची शान असलेला ताजमहल. काही जणांचा दावा आहे की ताजमहलबाबतही अशा काही गोष्टी आहेत ज्याविषयी मुद्दाम गुप्तता पाळली गेली आहे.

टॅग्स :Taj MahalताजमहालIndiaभारतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा