संघाचे मंथन
By Admin | Updated: May 5, 2014 00:08 IST2014-05-04T23:54:11+5:302014-05-05T00:08:49+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता अंतिम दोन टप्प्यातील निवडणुकीवर मंथन सुरू केले आहे. यात उत्तर प्रदेश व दक्षिण भारतातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

संघाचे मंथन
भाजप : अंंतिम टप्प्यातील निवडणुकीवर लक्ष
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता अंतिम दोन टप्प्यातील निवडणुकीवर मंथन सुरू केले आहे. यात उत्तर प्रदेश व दक्षिण भारतातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
याचाच एक भाग म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व भय्याजी जोशी यांनी रविवारी संघ कार्यालयात प्रचारकांशी सविस्तर चर्चा केली. दरम्यान आतापर्यंत झालेल्या मतदानाची समीक्षा करून, उर्वरित निवडणुकींचा आढावा घेण्यात आला. दरम्यान संघाच्या नेत्यांनी प्रचारकांना उत्तर प्रदेशातील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उत्तर प्रदेशातील काही मतदान केंद्रांवर कब्जा केल्याच्या तक्रारीचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. माहिती सूत्रानुसार यावेळी संघ प्रचारकांनी उत्तर प्रदेश व दक्षिण भारतातील निवडणुकीत भाजपाला चांगले समर्थन मिळण्याचा विश्वास व्यक्त केला. केरळचा अपवाद वगळता इतर सर्व दक्षिण राज्यात भाजप आपले खाते उघडेल, असेही ते म्हणाले. आगामी दोन टप्प्यातील मतदानानंतर संघ पुढील धोरण निश्चित करणार आहे. त्यासाठी प्रचारकांना आपापल्या क्षेत्रातील निवडणूक समीकरणानुसार रिपोर्ट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्या रिपोर्टच्या आधारे संघ मतमोजणीपूर्वीच देशात कुणाची सत्ता येणार याचा अंदाज घेणार आहे.