शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सनातनचा नेमका अर्थ काय, हिंदू शब्द पहिल्यांदा कधी वापरला गेला? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:06 IST

Sanatan Dharma Controversy: तामिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे.

Sanatan Dharma Controversy:तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे संपूत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. डीएमके नेते ए राजा यांनीही सनातनची तुलना एचआयव्ही सारख्या विषाणूशी केल्याने हा वाद आणखीनच वाढला आहे. या विधानांना भाजप नेत्यांकडून जोरदार विरोध केला जातोय. दरम्यान, ज्या सनातन शब्दावरुन वाद सुरू झाला आहे, त्याचा नेमका अर्थ काय आणि त्याची उत्पत्ती कधी झाली, हे जाणून घेऊ...

सनातन धर्म हजारो वर्षे जुना सनातन धर्माला हिंदू धर्म किंवा वैदिक धर्म असेही म्हणतात. हा जगातील सर्वात जुना धर्म म्हणून ओळखला जातो. भारतातील सिंधू संस्कृतीत सनातन धर्माची अनेक चिन्हे आढळतात. हा धर्म किती जुना आहे, या प्रश्नाकडे गेले तर त्याबद्दलही वेगवेगळे दावे केले जातात. काहीजण हा धर्म सुमारे 12 हजार वर्षे जुना असल्याचे सांगतात, तर इतर काही मान्यतेनुसार हा 90 हजार वर्षे जुना असल्याचेही सांगितले जाते.

हिंदू शब्दाचा पहिला वापरतुर्क आणि इराणी भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातून प्रवेश केला. सिंधू हे संस्कृत नाव आहे. त्यांच्या भाषेत 'स' हा शब्द नसल्यामुळे त्यांना सिंधूचा उच्चार करता येत नसल्याने ते सिंधू या शब्दाला हिंदू म्हणू लागले. अशा प्रकारे सिंधूचे नाव हिंदू झाले. इथे राहणाऱ्या लोकांना ते हिंदू म्हणू लागले आणि त्यामुळे हिंदूंच्या देशाला हिंदुस्थान हे नाव पडले.

सनातनचा खरा अर्थ?सनातन धर्म हा त्या काळापासूनचा आहे, जेव्हा कोणताही संघटित धर्म अस्तित्वात नव्हता आणि इतर कोणतीही जीवनपद्धती नसल्याने त्याला नावाची गरज नव्हती. यानंतर हळूहळू संघटित धर्म निर्माण झाले. सत्यालाच सनातन असे नाव दिले गेले. सनातन हा शब्द सत् आणि तत् मिळून बनलेला आहे. सनातन म्हणजे ज्याची सुरुवात आणि अंत नाही. सनातन धर्म मानणाऱ्यांनाच हिंदू म्हणतात. 

टॅग्स :HinduहिंदूTamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमBJPभाजपाcongressकाँग्रेस