शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 09:42 IST

धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देभाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगडमधल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पूर्णचंद पाधी यांच्या तक्रारीवरून रायपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सोशल मीडियावर देशाचे दोन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांचे फोटो अपलोड करून वादग्रस्त गोष्टी लिहिल्या असल्याचा आरोप संबित पात्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

नवी दिल्लीः भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगडमधल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पूर्णचंद पाधी यांच्या तक्रारीवरून रायपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावर देशाचे दोन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांचे फोटो अपलोड करून वादग्रस्त गोष्टी लिहिल्या असल्याचा आरोप संबित पात्रा यांच्यावर करण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक आरिफ शेख यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी पात्रांविरोधात पूर्णचंद पाधी नावाच्या व्यक्तीने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.पाधी हे छत्तीसगड युवा कॉंग्रेसचे प्रमुख आहेत आणि त्यांनी 10 मे रोजी पात्रा यांनी केलेल्या ट्विटवर तक्रार दाखल केली. पाधी यांनी असा दावा केला आहे की, काश्मीर प्रकरण, 1948च्या शीखविरोधी दंगली आणि बोफोर्स घोटाळ्यासंदर्भात पात्रा यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यावर खोटे आरोप केले आहेत.देश कोरोनाच्या संकटात सापडला असताना सोशल मीडियावर अशा गोष्टी लिहिणे केवळ विविध धार्मिक समुदायाला चिथावणी देणारेच नाही, तर शांततेत अडथळा आणणारे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  संबित पात्रा यांच्याविरोधात कलम 153 ए (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इ. च्या आधारे वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणारे), 505 (2) (सार्वजनिक छळ केल्याचे विधान) आणि 298 कलमांतर्गंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाcongressकाँग्रेस