शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

संभल हिंसाचाराची होणार चौकशी, सपा खासदार-आमदारांसह 2700 जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 17:17 IST

या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 24 पोलीस जखमी झाले आहेत.

UP Sambhal Violence: उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 24 नोव्हेंबर रोजी जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी सार्थल पोलीस चौकीचे प्रभारी दीपक राठी यांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के आणि आमदार इक्बाल महमूदचा मुलगा सुहेल इक्बालसह 800 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्याच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटनेत उपनिरीक्षक राठी जखमी झाले आहेत.

दरम्यान, मुरादाबादचे आयुक्त अंजनेय सिंह यांनी सोमवारी सांगितले की, संभल हिंसाचाराची दंडाधिकारी चौकशी केली जाईल. ज्या भागात हिंसाचार झाला, तो भाग वगळता अन्य भागात दुकाने सुरू असून परिस्थिती सामान्य आहे. ज्या प्रकारचे पुरावे मिळत आहेत, ते पाहता दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल आणि एनएसएदेखील लावला जाईल.

याप्रकरणी आतापर्यंत एकूण 7 एफआयआर दाखल करण्यात आले असून, त्यापैकी संभळ पोलीस ठाण्यात 5 तर नखासा पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर रोजी सकाळी झालेल्या हिंसाचारात उपनिरीक्षक शाह फैसल यांचे पिस्तूल चोरट्यांच्या जमावाने लुटले होते. त्यांच्या वतीने 6 ओळखीच्या आणि 200 अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एसडीएम रमेश बाबू यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावतीने 800 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्या पायाला गोळी लागलीपाहणी पथकातील सीओ अनुज चौधरी यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात सीओ अनुज चौधरी यांच्या पायाला गोळी लागली. यामुळे त्यांनीदेखील 700 ते 800 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एकता चौकीचे प्रभारी संजीव कुमार यांनीदेखील बंदुकीच्या गोळ्या/मॅगझीन लुटल्याप्रकरणी आणि अश्रुधुराचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्याकडून 150 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

अनेकांना अटकसंभल कोतवाली येथील 22 आणि नखासा पोलीस ठाण्यातील 3 अशा एकूण 25 जणांना अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या फुटेजचा अभ्यास करून आरोपींची छायाचित्रे काढली जात आहेत. संभल हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत एकूण 2750 अज्ञात आणि काही नावाजलेल्या लोकांविरुद्ध 7 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 24 पोलीस जखमी झाले आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस