संभाजीराजे पतसंस्थेची चौकशी करा
By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:41+5:302014-05-10T19:41:41+5:30
गडहिंग्लजच्या सहायक निबंधकांकडे मागणी

संभाजीराजे पतसंस्थेची चौकशी करा
ग हिंग्लजच्या सहायक निबंधकांकडे मागणी गडहिंग्लज येथे सहायक निबंधक ए. एच. भंडारे यांना निवेदन देताना नारायण देवार्डे व अशोक शिंदे. शेजारी श्रीपती भोसले, काशीनाथ पाटील, आप्पासाहेब कीकर, आदी.क्रमांक : १००५२०१४-गड-०७गडहिंग्लज :गडहिंग्लज येथील श्री छत्रपती संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानी व बेकायदेशीर कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी संस्था बचाव समितीतर्फे निवेदनातून येथील सहायक निबंधकांकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज नगरपालिका हद्दीतील मिळकत नंबर रि. स. नं. ११८/१ ब क्षेत्र ०.०६ आर म्हणजेच ४२७.५० चौ. मी. व घर नंबर ३८०९ ही आर. सी. सी. इमारत याचे क्षेत्रफळ ८१.६ चौ. मी. ही मिळकत संस्थेच्या मालकीची म्हणजेच सभासद व ठेवीदारांच्या मालकीची आहे.तथापि, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पाटोळे, उपाध्यक्ष अशोक देशपांडे, सचिव सदाशिव चोथे यांनी एकमेकांशी संगनमत करून स्वत: संस्थेकडील येणे कर्जे वसुलीबाबत कोणतीही कारवाई केली नाही. गेली १२ वर्षे एकहाती मनमानी कारभार करून संस्था अडचणीत आणली व संस्थेची खुली जागा व इमारत परस्पर हडप करण्याच्या इराद्याने सभासद व ठेवीदारांना विश्वासात न घेता खुली जागा व इमारत कवडीमोलाने विक्री करण्याचा फार्स केला आहे.या प्रकारामुळे संस्थेचे, सभासद व ठेवीदारांचे नुकसान झाले आहे. या बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी करून तो व्यवहार रद्द करावा आणि दोषी संचालक मंडळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर आप्पासाहेब कीकर, श्रीपती भोसले, काशीनाथ पाटील, आप्पासाहेब पाटील, नारायण देवार्डे, रामा बागडी, शामराव देसाई, संदीप सावरतकर यांच्या स्वाक्षर्या आहेत. (प्रतिनिधी)प्रतिक्रिया व्यवहार कायदेशीरच, बदनामी नकोसंस्था इमारत व जागा विक्रीचा व्यवहार सहायक निबंधकांच्या परवानगीनेच रितसर कोटेशन मागवून केला आहे. स्वत:च्या व समर्थकांच्या ठेवी काढून घेऊन संस्था अडचणीत आणलेल्या आणि थकबाकीदारांनीच चौकशीची मागणी करणे म्हणजे मोठा विनोदच आहे, हा केवळ बदनामीचा प्रयत्न आहे. कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी आहे.- वसंतराव पाटोळे, अध्यक्ष-श्री संभाजीराजे नागरी सहकारी पतसंस्था, गडहिंग्लज.