शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Samastipur Family Suicide: बिहारमध्ये 'बुरारी'सारखे प्रकरण, एकाच कुटुंबातील 5 जणांनी घेतला गळफास; मृतांमध्ये दोन मुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 12:52 IST

Samastipur Family Suicide:बिहारच्या समस्तीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढलले आहेत.

समस्तीपूर:बिहारच्या समस्तीपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांनी गळफास लावून आत्महत्या(Samastipur Family Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील बुरारी प्रकरणात ज्याप्रकारे संपूर्ण कुटुंबच फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, तसाच काहीसा प्रकार समस्तीपूरमध्ये घडला आहे. 

हे खळबळजनक प्रकरण विद्यापतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मढ गावचे आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. पाच जणांच्या आत्महत्येच्या वृत्ताने परिसरात खळबळ उडाली असून, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कुटुंबातील 5 जणांना फासावर लटकलेमढ गावातील प्रभाग 11 मध्ये राहणारे मनोज झा ऑटो चालवून आणि खैनी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते वडील रविकांत झा, आई सीता देवी, पत्नी सुंदरमणी देवी आणि दोन मुलांसोबत राहत होते. घराचा गाडा हाकण्यासाठी मनोज यांनी अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाचा बोजा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण न केल्यामुळे मनोज झा खूप अस्वस्थ असायचे. 

मनोज दिलेल्या मुदतीत कर्ज परत करू शकले नव्हते. सातत्याने प्रयत्न करूनही त्यांच्यावरील कर्जाचा बोजा कमी होत नव्हता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यातच पैसे पैसे देणारे सतत त्यांच्या घरी येत असत. अखेर आर्थिक विवंचनेमुळे संपूर्ण कुटुंबानेच हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे.

प्रकरणाचा तपास सुरू मृतांमध्ये रविकांत झा यांचा मुलगा मनोज झा (45, रा. प्रभाग 11), मनोज झा यांची आईसीता देवी (65), मुलगा सत्यम कुमार (10) आणि शिवम कुमार (07), तसेच, पत्नी सुंदरमणी देवी(38) यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू