शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:16 IST

डिंपल यादव यांनी गुरुवारी कुमारगंज ते मिल्कीपूर असा रोड शो काढला होता.

उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांचा गुरुवारी (दि.३०)रोड शो आयोजित करण्यात आला होता. आता या रोड शो प्रकरणी अज्ञात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डिंपल यादव यांनी गुरुवारी कुमारगंज ते मिल्कीपूर असा रोड शो काढला होता. याप्रकरणी इनायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक आलोक कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल डिंपल यादव यांच्या रोड शोबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोड शो दरम्यान परवानगीपेक्षा जास्त वाहने वापरली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, डिंपल यादव यांच्या रोड शोमुळे रायबरेली महामार्गाच्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी झाली होती.

रोड शोचे फोटो सोशल मीडियावर शेअरडिंपल यादव यांनी मिल्कीपूर पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ केलेल्या रोड शोचा फोटोही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांच्या रोड शोमध्ये प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या लांब रांगा दिसून येत आहेत.

मिल्कीपूर विधानसभेची पोटनिवडणूकमिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव गुरुवारी येथे पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मिल्कीपूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद उपस्थित होते. तसेच, फैजाबादचे खासदार आणि अजित प्रसाद यांचे वडील अवधेश प्रसाद हे देखील डिंपल यादव यांच्यासोबत रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

भाजपकडून चंद्रभान यादव यांना उमेदवारीसमाजवादी पक्षाने मिल्कीपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने मिल्कीपूरमधून चंद्रभान यादव यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तसेच, या पोटनिवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीElectionनिवडणूक 2024