शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा मित्र करणार काँग्रेसशी दोन हात, महाआघाडीला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 17:38 IST

गेल्या वर्षी हातात हात घेणाऱ्या मित्रानं सोडली काँग्रेसची साथ

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातकाँग्रेसच्या साथीनं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या समाजवादी पक्षानं काँग्रेसप्रणित महाआघाडीत न जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हातात हात घालून प्रचार करताना दिसलेल्या अखिलेश यादव यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. प्रादेशिक पक्षांनी एकत्रित येऊन तिसरी आघाडी करण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे. भाजपा आणि काँग्रेससोबत न जाता तिसरी आघाडी तयार करण्याच्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संकल्पनेचं अखिलेश यादव यांनी समर्थन केलं आहे. मी स्वत: राव यांच्या भेटीसाठी हैदराबादला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशात समाजवादी पक्षानं काँग्रेसला पाठिंबा दिला. मात्र त्यांच्या आमदाराला मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्याबद्दल अखिलेश यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसनं समाजवाद्यांचा रस्ता मोकळा केला असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजपावाले आम्हाला मागासलेले समजतात. याबद्दल त्यांचेही आभार मानतो, असंदेखील ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून देशात महाआघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेणार आहे, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं. 'प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची संकल्पना चांगली आहे. राव यांच्या या संकल्पनेला माझा पाठिंबा आहे,' असं यादव म्हणाले. भाजपा जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागते. निवडणुकीच्या आधी त्यांना समाजवादी मागास वाटत होते. त्यामुळे आम्ही त्यांना धन्यवाद देतो, असा तिरकस निशाणा त्यांनी साधला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९