शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१०० आमदार फोडा, मुख्यमंत्री बना; उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर, भाजपाचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 11:40 IST

पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत

लखनौ - उत्तर प्रदेशात २ विधानसभा, १ लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यात समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीत यांच्यात थेट लढत आहे. ज्याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे त्यात रामपूर आणि मुरादाबादच्या खतौली विधानसभेचा समावेश आहे तर मैनपुरी लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. 

पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. याचवेळी रामपूर निवडणुकीत प्रचार करताना समाजवादीचे पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यूपीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना १०० आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना अशी खुली ऑफर दिली आहे. अखिलेश यादव यांचं असं विधान पहिल्यांदाच आलंय असं नाही तर याआधीही व्यासपीठावरून त्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ऑफर दिलीय. पण यावेळी उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनाही ही ऑफर दिली. 

अखिलेश यादव नेमके काय म्हणाले?अखिलेश यादव रामपूरमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी यूपीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, हे लोक ठिकठिकाणी येऊन सांगत आहेत की आम्ही माफिया आहोत, आम्ही लोकांना गुन्हेगार म्हणतो, पण मुख्यमंत्री कधी होणार या द्विधा मन:स्थितीत ते आहेत. मी यापूर्वीही ऑफर दिली होती, मी रामपूरमधूनही ऑफर देत आहे. १०० आमदार तुमच्यासोबत आणा, आम्ही १०० आमदारांसह तुमच्यासोबत तयार आहोत, सरकार बनवा आणि मुख्यमंत्री व्हा. तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून फिरताय, उपमुख्यमंत्र्यांमध्ये काय आहे? असा सवाल त्यांनी केला. 

अखिलेश यादवांवर भाजपाचा पलटवारअखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने प्रत्युत्तर दिले. अखिलेश यादव यांना उत्तर देण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्रीही पुढे आले. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत अखिलेश यादव यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तुम्ही ना मुख्यमंत्री बनू शकणार आहात, ना अन्य कुणाला बनवू शकणार आहात. मैनपुरी आणि रामपूरमधील पराभवाचं सावट पाहून तुमचं मानसिक संतुलन ढासळल्याचं दिसतंय. गुंडगिरी, बूथ काबीज करू शकणार नाही. जनतेने सपाची सायकल नाकारली आहे असं त्यांनी सांगितले. तर समाजवादी पक्षाचे लोक स्वप्न पाहत आहेत. मुंगेरीलाल के हसीन सपने पाहिली जात आहेत. विरोधकांकडे एकही मुद्दा शिल्लक नाही, त्यामुळे काहीही वक्तव्ये करत आहेत. पोटनिवडणूक हा ट्रेलर आहे, २०२४ मध्ये आम्ही सर्व जागा जिंकू असा विश्वास उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी व्यक्त केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी