शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समारंभाने दिला आल्हाददायक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 03:09 IST

दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात आल्हाददायक वातावरण होते. लोकमत संसदीय पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी आलेले जेष्ठ

दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात आल्हाददायक वातावरण होते. लोकमत संसदीय पुरस्कार वितरण समारंभात सहभागी होण्यासाठी आलेले जेष्ठ नेते, विविध देशातील डिप्लोमॅट आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी हा अगदी वेगळा अनुभव होता. अशा कार्यक्रमात ते पहिल्यांदाच सहभागी होत होते. सर्वजण एकमेकांशी भेटत होते, पुरस्कारासाठी निवडल्या गेलेल्या जेष्ठ खासदारांचे अभिनंदन करीत होते. हे जणू स्रेहसंमेलनच असल्याचे जाणवत होते. अडवाणीजी नेहमीप्रमाणे गंभीर मुद्रेत बसले होते. परंतु अधूनमधून त्यांच्याही ओठांवर हसू उमटायचे. शरद यादव नेहमीप्रमाणे उत्साहात सगळयांशी भेटत होते. फारुख अब्दुल्ला यांचा हटके अंदाज या कार्यक्रमातही कायम होता. वेंकैया नायडू यांच्या विनोदी स्वभावाची झलक येथेही पाहायला मिळाली. विज्ञान भवनात एकत्रित सर्व मंडळी लोकमत मीडिया समूहाचे कौतुक करीत होते आणि हा उप्रकम प्रेरणादायी पुढाकार असल्याचे सांगत होते.या उपक्रमामुळे युवा खासदारांमध्ये एक विधायक संदेश जाईल, असा विश्वासही या मान्यवरांनी व्यक्त केला. मान्यवरांच्या भाषणातील हे काही निवडक मुद्दे...!अनेक आमंत्रितांना दारातूनच परतावे लागलेनवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित लोकमत संसदीय पुरस्कार समारंभात वेळेच्या अटीमुळे सुमारे अडीचशेपेक्षा जास्त आमंत्रित सहभागी नाही होऊ शकले. बरोबर ५ वाजता दार बंद झाले. अनेक कॅबिनेट मंत्री, राज्य मंत्री, खासदार, डिप्लोमेट आणि उद्योजकांना परत जावे लागले. एक मिनट उशिरा आलेले सीताराम येचुरी यांनाही अडचणीचा सामना करावा लागला. त्यांनी माझ्याही नावाचा पुरस्कार असल्याचे सांगितल्यावरच त्यांना आत सोडले गेले.देशातील अग्रणी मीडिया हाऊस ‘लोकमत’कडून संसदीय पुरस्कारांचे आयोजन आमच्या लोकतांत्रिक संस्थांंच्या भविष्यासाठी एक चांगले संकेत आणि संसदेतील प्रदर्शनाप्रति सन्मान आहे. आमची राज्यघटना लोकशाहीला एक सुरक्षा कवच प्रदान करते. ही भावना एक वेगळी आणि महत्त्वपूर्र्ण पैलू आहे. निर्वाचित प्रतिनिधींचे हे कर्तव्य आहे की त्यांनी लोकशाही आणि तिच्या भावनेला जिवंत ठेवण्यासोबतच संसदीय परंपरांचेही योग्य पालन केले पाहिजे. याचेच शेवटचे टोक संसद सदस्यांचा खासगी व्यवहार आणि विश्वसनीयतेशी जुळलेले आहे. जे नागरिकांचे संसदीय लोकशाही संस्थांवरील विश्वासाला कायम ठेवत असते.-एम. हमीद अन्सारी, उपराष्ट्रपतीलोकशाही ही ५१ आणि ४९ चा खेळ नाहीय. लोकशाही खºया अर्थाने एक नैतिक व्यवस्था आहे. संसद म्हणजे लहान न्यायालय नाही, जिथे शब्दांची चीरफाड केली जाते. तो एक राजकीय मंच आहे. इथे मी राजकीय या शब्दाचा प्रयोग मर्यादित अर्थाने नाही तर व्यापक अर्थाने करतो. जिथे देशातील ९० कोटी नागरिकांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि निराशेला प्रतिबिंबित आणि प्रतिध्वनित केले गेले पाहिजे.(माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वाक्य ज्यांचा उपराष्ट्रपती एम. हमीद अन्सारी यांनी आपल्या भाषणात पुनरोच्चार केला)सरकार एखादा प्रस्ताव आणेल आणि विरोधी पक्ष त्याचा विरोध करेल, हा लोकशाहीचा सिद्धांत आहे. परंतु संसदेचे काम बाधित वा थांबायला नको. संसदेत जर विरोधी पक्षाचा ‘से’(म्हणणे) असेल तर सरकारजवळ ‘वे’ (मार्ग) असायला हवा. संसदेचे सदस्य एकमेकांचे शत्रू नसतात. ते केवळ राजकीय प्रतिस्पर्धी असतात. कारण सगळेच वेगवेगळ्या दिशेत काम करीत असतात. त्यांची विचारधारा वेगवेगळी असली तरी त्यांचा अंतिम उद्देश लोकांना समृद्ध आणि आंनदी बनवणे इतकाच असतो.- एम. वेंकैया नायडू,भाजपाचे जेष्ठ नेता आणि माजी केंद्रीय मंत्री.अडवाणीजी आणि माझ्या वयात बरेच अंतर आहे. अडवाणीजी पक्षाचे अध्यक्ष होते, तेव्हा मी युवक चळवळीचा कार्यकर्ता होतो. परंतु हे माझे सौभाग्य आहे की अटलजी आणि अडवाणीजी ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीवर मला अतिशय कमी वयात बसण्याची संधी मिळाली. अडवाणीजी यांच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, आणीबाणीच्या काळातील त्यांचा संघर्ष. या देशातील लोकशाही वाचविण्यात ज्या महानुभावांचे विशेष योगदान आहे त्यात अडवाणीजींचे कार्य खूप मोठे आहे. कारागृहात असताना त्यांनी जे अनुभव लिहिले ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आहेत. ते माझे ‘गाईड’, ‘फिलॉसॉफर’सगळे काही आहेत.-नितीन गडकरी,केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग आणि जहाजबांधणीमंत्री‘विधिमंडळ आणि संसद लोकशाहीचे महामंदिर आहेत आणि जनता या मंदिरातील साक्षात आणि सार्वभौम देवता आहे. येथे येणारे प्रतिनिधी त्याचे उपासक आहेत. या उपासकांची सेवा-साधना म्हणजे लोकसभा-राज्यसभेत होणारी चर्चा आहे. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि निष्ठा, निष्ठा आणि प्रतिष्ठा, प्रश्न आणि उत्तर, आवेग आणि विनंती या भिन्न गोष्टींचा पावन संगम येथे पहायला मिळतो. वाणीवर नियंत्रण मिळवून आपली गोष्ट कशी सांगितली पाहिजे, पूर्ण सन्मान बाळगत शाब्दिक हल्ला कसा केला पाहिजे, विनम्र राहूनही अगदी मर्मावर प्रहार कसे करता येईल, अंतर बाळगूनही बंधुभाव कसा जपला जाईल, अल्पमताने बहुमताशी आणि बहुमताने अल्पमताशी कसे वागले पाहिजे आणि ही सर्व कसरत सांभाळतानाही लोकसेवेचा मूळ भाव कसा कायम ठेवता येईल, या सर्व गोष्टींचे अतिशय दक्षतेने पालन करणे म्हणजेच वैधानिक कार्य आहे.’(महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, गांधीवादी नेतेबाळासाहेब भारदे यांच्या पुस्तकातील विचार, ज्याचा उच्चार माजी राज्यसभा सदस्य व लोकमत समूह एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या स्वागत भाषणात केला)