सॅल्युट टू ह्युमॅनिटी! जखमी नक्षलवाद्यासोबत CRPF जवानाने जोडले 'रक्ताचे नाते'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:58 PM2019-02-09T15:58:00+5:302019-02-09T15:59:46+5:30

झारखंड येथील नक्षल भागात कमांडोंच्या गोळीबारात नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता.

Salute to humanity! Selfless CRPF Jawan Donates Blood To Injured Naxal Because Duty As An Indian Comes First! | सॅल्युट टू ह्युमॅनिटी! जखमी नक्षलवाद्यासोबत CRPF जवानाने जोडले 'रक्ताचे नाते'

सॅल्युट टू ह्युमॅनिटी! जखमी नक्षलवाद्यासोबत CRPF जवानाने जोडले 'रक्ताचे नाते'

Next

रांची - सीआरपीएफच्या 133 बटालियनचे जवान राजकुमार यांनी एका नक्षलवाद्यासाठी रक्तदान करत आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले आहे. झारखंड येथे 209 कमांडो बटालियनच्या तुकडीसोबत मिशन क्रोब्रामध्ये (कठोर कारवाई) जवानांच्या चकमकीत हा नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, बटालियनच्या जवानांनी या जखमी नक्षलवाद्याला रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार केले. या उपचारावेळी जवानातील माणुसकी पाहून अनेकांचा उर भरून आला.

झारखंड येथील नक्षल भागात कमांडोंच्या गोळीबारात नक्षलवादी गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर, या नक्षलवाद्यास रांची येथील राजेंद्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या नक्षलवाद्यास अनेक ठिकाणी जखम झाल्याने त्यास रक्ताची गरज असल्यांच डॉक्टरांनी सांगितल. त्यावेळी, क्षणाचाही विलंब न करता सीआरपीएफ जवान राजकुमार हे तात्काळ रक्तदान करण्यासाठी पुढे सरसावले. तर, सर्वप्रथम एक भारतीय म्हणून मी माझं कर्तव्य बजावत असल्याचे या जवानाने म्हटले आहे. दरम्यान, काही वेळातच सोशल मीडियावर या जवानाचा रक्तदान करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. अनेकांनी सॅल्युट आणि जय हिंद म्हणत या जवानाचे कौतुक केले आहे. दरम्यान, ट्विटरवही सीआरपीएफच्या अधिकृत अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करण्यात आली आहे.  



 

Web Title: Salute to humanity! Selfless CRPF Jawan Donates Blood To Injured Naxal Because Duty As An Indian Comes First!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.