हिट अँड रनप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ
By Admin | Updated: February 10, 2016 19:58 IST2016-02-10T19:58:30+5:302016-02-10T19:58:30+5:30
हिट अँड रन प्रकरणी या दुर्घटनेतील पीडित नुरुल्ला शेखच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेख कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

हिट अँड रनप्रकरणी सलमान खानच्या अडचणीत वाढ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले पण त्यांनंतर महाराष्ट्र सरकारने सलमान विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार होते पण त्यापुर्वीच आज सलमानच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिट अँड रन प्रकरणी या दुर्घटनेतील पीडित नुरुल्ला शेखच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेख कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून १२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
काय आहे हे प्रकरण - २८ सप्टेंबर २००२ हिट अँड रन प्रकरण घडले. सलमानने लँड कु्रझर गाडी भरधाव चालवत वांद्रे येथील अमेरिकन एक्सप्रेस बेकरीजवळील फुटपाथवर चढवली. पदपथावर झोपलेले पाच जण गाडीखाली चिरडले गेले. यातील एकाचा बळी गेला. असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सलमानविरोधात वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात भरधाव गाडी चालवण्याचा खटला सुरू होता. मात्र २००३ मध्ये सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला व हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हायकोर्टात जामीन मिळवत सलमानने तुरुंगवारी वाचवली होती. त्यानंतर सबळ पुराव्याअभावी मुंबई उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०१५ रोजी त्याला निर्दोष मुक्त केले होते.