खारफुटींचे होणार संवर्धन

By Admin | Updated: May 30, 2014 23:59 IST2014-05-30T20:06:06+5:302014-05-30T23:59:53+5:30

: मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगर पालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे.

Salinity | खारफुटींचे होणार संवर्धन

खारफुटींचे होणार संवर्धन

मुंबई : मुंबईतील खारफुटी (मॅनग्रोव्ह) झाडांचे संवर्धन करण्यासाठी आता महानगर पालिका प्रशासन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार आहे. विशेष म्हणजे खारफुटी झाडांच्या विभागांची वृक्ष प्राधिकरण पाहणी करणार आहे.
मुंबई शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता समुद्राच्या आसपास बर्‍याच प्रमाणात खारफुटीची वने आहेत. त्या वनांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पालिका प्रशासन या क्षेत्रातील शासकीय अधिकारी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेेणार आहे. याबाबत लवकरच संगणकीय सादरीकरण व संयुक्त आढावा बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. वृक्षप्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत आणि तज्ज्ञ अधिकार्‍यांसमवेत खारफुटी विभागांचा संयुक्त पाहणी दौराही आयोजित करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकूण ३९ विषय मंजुर करण्यात आले आहेत. वृक्ष छाटणी व इतर पावसाळा पूर्व कामांची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय वृक्ष छाटणी व वृक्ष संवधर्नासाठी लागणार्‍या बाबींची पूतर्ता करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण मुंबईत १ लाखांपेक्षाही जास्त झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे. येत्या पावसाळ्यात कमीत कमी वृक्ष उन्मळून पडतील. कारण, झाडांच्या फांद्यांचा समतोल राखून वृक्ष छाटणी करण्यात आली आहे.
झाडांचे पुर्नरोपण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला पुर्नरोपण केलेली झाडे तीन वर्ष जगल्यानंतरच कंत्राटदारांचे पैसे देण्यात येणार आहेत. पि›म रेल्वेच्या रेल्वे हद्दीतील रेल्वे जमिनीलगत असलेल्या २९ झाडांना तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ४०७ झाडांच्या फांद्याही छाटण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
..............................................

Web Title: Salinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.