साळगावकर संघ उपांत्य फेरीत
By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:35+5:302015-08-13T22:34:35+5:30
पोलीस चषक : चर्चिल ब्रदर्स संघाचा 2-1 ने पराभव

साळगावकर संघ उपांत्य फेरीत
प लीस चषक : चर्चिल ब्रदर्स संघाचा 2-1 ने पराभव मडगाव : कुंकळ्ळी येथील मैदानावर झालेल्या पोलीस चषक फुटबॉल स्पर्धेत साळगावकर संघाने चर्चिल ब्रदर्स संघाचा 2-1 गोलने पराभव केला. याबरोबरच त्यांनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता त्यांचा सामना सांताक्रूझ क्लब ऑफ केळशी संघाविरुद्ध रविवारी (दि. 16) वास्को येथील टिळक मैदानावर होईल. या सामन्यात साळगावकरच्या संघाने चांगल्या खेळाची सुरूवात केली होती तसेच चर्चिल ब्रदर्स संघाच्या खेळाडूंनी बचावफळीवर उत्कृष्ट प्रदर्शन करून साळगावकर संघाच्या आघाडी खेळाडूंना थोपविण्याचे प्रय} केले होते. मात्र 30 व्या मिनीटाला साळगावकर संघाच्या निकलांव फर्नाडीसने चर्चिल र्बदर्स संघाची आघाडी भेदून सॅमसन फर्नाडीसने दिलेल्या पासवर गोलाची नोंद करून संघाला आघाडी मिळवून दिली तर 7 मिनीटाच्या अंतराने चर्चिल र्बदर्स संघाचा आघाडी खेळाडू जेसन बाबरेजाने मायरन बॉर्जिसने दिलेल्या पासवर बरोबरीचा गोल केला व सामना मध्यंतरपर्यंत 1-1 असा राहिला.दुस-या सत्रातही साळगावकर संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाला सुरूवात केली. व सामन्याच्या दहा मिनीटाच्या आत दुसरा गोल केला यात गोलाची नोंद नरहरी शिरीस्थानने मायरन बॉर्जिसच्या पासवर केली व संघाला 2-1 ची आघाडी मिळवून दिली त्यानंतर सामना संपण्यात दहा मिनीटे बाकी असताना चर्चिल ब्रदर्स संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट चढाया केल्या पण त्यांना दुस-या वेळी बरोबरी साधता आली नाही. व त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात साळगावकर संघाच्या रोहन श्ेाखने चर्चिल ब्रसर्द संघाच्या खेळाडूंचे फटके अडवीण्यात यशा मिळवीले यात कमलजीत सिंग व अँल्विस बर्ाेटो यांचा समावेश आहे.आजचा सामना : धेंपो स्पोर्टस् क्लब वास्को स्पोर्टस् क्लब. स्थळ कुंकळळ्ळी मैदान- संध्या 4 वाजता ढँ3 : 1308-टअफ-15कॅप्शन: पोलीस चषक फुटबॉल स्पर्धेतील कुंकळ्ळी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात चेंडू ताब्यात मिळवीण्याच्या प्रय}ात दोन्ही संघाचे खेळाडू.