सालेमला जन्मठेप हे माझ्या प्रयत्नांना यश

By Admin | Updated: February 26, 2015 02:45 IST2015-02-26T02:45:20+5:302015-02-26T02:45:20+5:30

बिल्डर प्रदीप जैन खून प्रकरणात गँगस्टर अबू सालेम याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हाची ती वेळ पोलीस निरीक्षक सुनील माने

Salem's life imprisonment was my success | सालेमला जन्मठेप हे माझ्या प्रयत्नांना यश

सालेमला जन्मठेप हे माझ्या प्रयत्नांना यश

डिप्पी वांकाणी, मुंबई
बिल्डर प्रदीप जैन खून प्रकरणात गँगस्टर अबू सालेम याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली तेव्हाची ती वेळ पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्यासाठी फार समाधानाची होती. माने २००८ मध्ये दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) उपनिरीक्षक
होते.
तेव्हापासून या प्रकरणात गुन्हा सिद्ध होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. साक्षीदार आणि माफीच्या साक्षीदारांच्या संरक्षणाचे काम माझ्याकडे असल्यामुळे सालेम मला नेहमी म्हणायचा की ‘तुम मुझे पहुंचाकेही रहोगे’, असे माने यांनी सांगितले.
प्रदीप जैन यांचा भीषण खून झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि प्रदीप यांचा भाऊ भयंकर घाबरले होते. अशा स्थितीत त्यांना न्यायालयात साक्ष देण्यास मानसिकदृष्ट्या तयार करणे, हे माझ्यासाठी सुरुवातीला आव्हान होते. प्रदीप जैन यांच्या तेराव्या दिवशी सालेम म्हणाला होता की ‘मातम मना लो, लेकिन अगर मेरे पैसे पुरे नहीं हुए तो एक आदमी और मारूंगा.’ तुमचे पूर्ण संरक्षण होईल याची जैन कुटुंबीयांना खात्री देणे हे माझे काम होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रदीप यांची पत्नी न्यायालयात यायला तयार झाली; पण मी त्यांच्यासोबत असेन तर येणार या अटीवर, असे सुनील माने म्हणाले.
या प्रकरणाची धार कमी करण्याचे सर्व प्रयत्न सालेमने केले, असे सांगून माने म्हणाले, की राजकीय पुढारी आणि एवढेच काय काही व्यावसायिकांनीही मला हे प्रकरण एवढे गांभीर्याने का घेता, असे विचारून काही देऊ केले. परंतु मी त्यांना भीक घातली नाही, कारण सालेमचा गुन्हा सिद्ध करणे हेच माझे लक्ष्य होते.
मी साक्षीदारांना ‘शिकवून तयार’ केले असे आरोप स्वत: सालेमने केले. पर्यायाने खटल्याची सुनावणी सुरू असताना मला न्यायालयात उपस्थित राहायचे नाही, असे सांगण्यात आले. परंतु आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यामुळे त्या सगळ्या प्रयत्नांना यश आले आहे, असेही माने यांनी म्हटले.

Web Title: Salem's life imprisonment was my success