१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 20:41 IST2025-11-03T20:39:29+5:302025-11-03T20:41:32+5:30
एका इंजिनिअरचा व्हिसा फक्त ६० सेकंदात रिजेक्ट करण्यात आला आहे. यावेळी अधिकाऱ्याने फक्त तीनच प्रश्न विचारले.

१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
एक सॉफ्टवेअर इंजिनिअर टेक्नॉलॉजी परिषदेसाठी अमेरिकेला जाणार होते. पण त्यांचा व्हिसा अधिकाऱ्यांनी फक्त ६० सेकंदात रिजेक्ट केला. याबाबत त्या इंजिनिअरने आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ते इंजिनिअर भारतातील एका मोठ्या टेक कंपनीत वरिष्ठ टेक लीड म्हणून काम करतात. त्यांना वार्षिक पगार अंदाजे १ कोटी मिळतो. त्यांनी अमेरिकेतील अटलांटा येथे होणाऱ्या कुबेकॉन + क्लाउडनेटिव्हकॉन २०२५ टेक कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी B1/B2 व्हिसासाठी अर्ज केला होता.
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
त्या इंजिनिअरने रेडिटवर आपला अनुभव शेअर केला. नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासात मुलाखतीदरम्यान, अधिकाऱ्याने फक्त तीन प्रश्न विचारले.फक्त एका मिनिटात त्यांचा अमेरिकन व्हिसा नाकारण्यात आला. यानंतर अर्जदाराला धक्का बसला. याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
हे तीन प्रश्न विचारले
१.प्रवासाचा उद्देश काय आहे?
२.याआधी तुम्ही कोणत्या देशात प्रवास केला?
३. तुमचे अमेरिकेत कोणी नातेवाईक किंवा मित्र आहेत का?
या तीन प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर लगेचच त्यांना व्हिसा नाकारण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया ६० सेकंदात पूर्ण झाली. त्या इंजिनिअरांनी ११ वर्षे एकाच कंपनीमध्ये काम करुन रेकॉर्ड केले आहे. त्यांनी यापूर्वी लिथुआनिया, मालदीव आणि इंडोनेशिया सारख्या देशांमध्ये प्रवास केला होता, त्यांना आता अमेरिकेत जाऊन परतण्याची संधी होती. तरीही, त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला.
सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. त्यांनी रेडिटवर हा अनुभव शेअर केल्यानंतर हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. जर इतका चांगला पगार, स्थिर नोकरी आणि कुटुंब असूनही व्हिसा मिळत नसेल, तर सामान्य लोकांचे काय होईल?, असा सवाल अनेकांनी केला. अमेरिकन दूतावासाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, व्हिसा देणे हे अधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असते. जर एखाद्या उमेदवाराचे त्याच्या देशाशी असलेले संबंध (जसे की कुटुंब, नोकरी, मालमत्ता इ.) पुरेसे मानले गेले नाहीत, तर व्हिसा नाकारला जाऊ शकतो.