शारीरिक सुखासाठी विद्यार्थ्याने शिक्षिकेला कोंडले बाथरुमध्ये
By Admin | Updated: January 19, 2017 18:45 IST2017-01-19T17:07:11+5:302017-01-19T18:45:32+5:30
दिल्लीतील एका सरकारी शाळेतील 44 वर्षीय शिक्षिकेने अत्यंत धक्कादायक आरोप अज्ञात विद्यार्थ्यावर केले आहेत.

शारीरिक सुखासाठी विद्यार्थ्याने शिक्षिकेला कोंडले बाथरुमध्ये
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - दिल्लीतील एका सरकारी शाळेतील 44 वर्षीय शिक्षिकेने अत्यंत धक्कादायक आरोप अज्ञात विद्यार्थ्यावर केला आहे.
दिल्लीच्या शाहदरा जिल्ह्यातील विवेक भागातील सरकारी शाळेतील ही शिक्षिका आहे. ही शिक्षिका १२.५० च्या सुमारास बाथरुमध्ये गेली असता बाहेरून दरवाज्याची कडी लावल्याचा आवाज आला. त्यानंतर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका विद्यार्थ्याकडून त्याच्याकडून शरिरीक सुखाची मागणी करण्यात आली. त्यानंतर या शिक्षिकेने आरडा-ओरडा केल्यामुळे तो विद्यार्थी तेथून पळून गेला. जवळपास 15 मिनिटांच्या कालावधीनंतर शाळेतल्या कर्मचा-यांनी बाथरुमच्या दरवाज्याची कडी उघडली आणि या शिक्षिकेची सुटका झाली. दरम्यान, या घटनेनंतर शिक्षिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.