साई मंदिर दोन तास खुले ठेवणार
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:18+5:302015-07-31T22:25:18+5:30
- कुंभमेळ्यानिमित्त भाविकांची गर्दी

साई मंदिर दोन तास खुले ठेवणार
- ुंभमेळ्यानिमित्त भाविकांची गर्दीशिर्डी : नाशिक येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी होण्याची शक्यता ध्यानी घेऊन पंढरपूरच्या धर्तीवर साईबाबा मंदिरही आणखी दोन तास खुले ठेवण्याचा निर्णय त्रिसदस्यीय समितीने घेतला आहे़ हा निर्णय दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर असेल.रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून पहाटेची काकड आरती ४़३० ऐवजी ३.३० वाजता तर शेजारती रात्री ११़३० वाजता होणार आहे़ आजमितीस दररोज एक ते सव्वा लाख भाविक दर्शन घेऊ शकत होते़ दोन तास अधिक वेळ वाढल्याने २५ हजार अधिक भाविक दर्शन घेऊ शकतील़ शिर्डीत यापूर्वी २००८ मध्ये अशा पद्धतीने जादा वेळ मंदिर खुले ठेवले गेले होते़ (तालुका प्रतिनिधी)