लोखंडाचे खिळे, पिन, चेन अन् बांगड्या; महिलेच्या पोटातून काढलं दीड किलोचं भंगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:26 IST2018-11-13T14:00:56+5:302018-11-13T14:26:57+5:30

संगीता असं या महिलेचं नाव असून पोट दुखीच्या तक्रारीसाठी तिला 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दीड किलोच्या वस्तू काढण्यात आल्या.

safety pins hair pins copper rings and many doctors find out from a woman stomach in ahmedabad | लोखंडाचे खिळे, पिन, चेन अन् बांगड्या; महिलेच्या पोटातून काढलं दीड किलोचं भंगार

सौजन्य : नवभारत टाइम्स

ठळक मुद्देसंगीता असं या महिलेचं नाव असून पोट दुखीच्या तक्रारीसाठी तिला 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संगिता महाराष्ट्रातील शिर्डीची रहिवाशी असून मानसिक रुग्ण आहे. महिलेवर तातडीनं शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातील लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या आहेत.

अहमदाबाद - लोखंडी खिळे, यू-पिन, सेफ्टी पिन, हेयर पिन, ब्रेसलेट, चैन, मंगळसुत्र, कॉपर रिंग आणि बांगड्या या गोष्टी प्रामुख्याने दुकानात उपलब्ध असतात. मात्र एखाद्या महिलेच्या पोटातून अशाप्रकारचं सामान बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अहमदाबादच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये एका महिलेच्या पोटातून लोखंडाच्या काही वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. 

संगीता असं या महिलेचं नाव असून पोट दुखीच्या तक्रारीसाठी तिला 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दीड किलोच्या वस्तू काढण्यात आल्या. संगीता महाराष्ट्रातील शिर्डीची रहिवाशी असून मानसिक रुग्ण आहे. अहमदाबादच्या शाहरकोटडा परिसरात संगीता पोलिसांना फिरताना दिसली. कोर्टाच्या आदेशानंतर तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात दुखत असल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे एक्सरे काढले. त्यामध्ये त्यांना काही धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर तातडीनं शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातील लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या आहेत. डॉ. परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या महिलेला 'एकुफेगिया' हा मानसिक आजार आहे. हा आजार असलेला व्यक्ती अशा विचित्र वस्तू गिळतात. परंतु अत्यंत दुर्मिळ असा हा आजार असल्यानं याचे रुग्ण क्वचितच आढळतात'.

Web Title: safety pins hair pins copper rings and many doctors find out from a woman stomach in ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.