शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दिवसभरात केवळ दोन कप चहा, तरीही पूर्णपणे निरोगी; डॉक्टरही संभ्रमात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 10:27 IST

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात.

इंदूर : 

रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात. तरीही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. ६२व्या वर्षीही त्यांना कोणताही आजार नाही. चहामुळे लोक नेहमीच असिडिटीची तक्रार करतात. पण साध्वी विमला यांना कधीच याचाही त्रास झाला नाही.

खरतरगच्छ श्री संघच्या विमलयशा श्रीजी मसा ह्या याला संकल्पाच्या शक्तीचा चमत्कार असल्याचे सांगतात. त्या सकाळी ७.३० वाजता आणि ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान दुसऱ्यांदा चहा घेतात. त्या दुपारी ३ नंतर पाणीसुद्धा घेत नाहीत, त्या सांगतात की, संयम, त्याग हाच जीवनातील सर्वात मोठा संकल्प असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, आमचे जीवन त्यागमयी आहे. साधू जीवन आहे. जितका त्याग करू तेवढेच पुढे जाऊ. मनात जेव्हा काही खाण्याची लालसा राहते तेव्हा कठीण होते, मन भटकते, पण भटकत्या मनाला रोखणे हे आपल्याच हातात असते. जोपर्यंत मन मान्य करत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य होत नाही आणि जेव्हा मन तयार तेव्हा कठीण कामही सहज होऊन जाते. खरतरगच्छ श्री संघचे प्रचार सचिव योगेंद्र सांड यांनी सांगितले की, या अनोख्या तपामुळे त्यांची ख्याती चहावाली म. सा. नावाने आहे. त्यांनी १४ मे १९७५ रोजी अक्षय तृतीयेला दीक्षा घेतली होती.

डॉक्टरही संभ्रमात : दिवसभर कशा राहतात उत्साही

  • साध्यींची वैद्यकीय तपासणी करणारे फिजिशियन डॉ. रुपेश मोदी सांगतात की, त्या ६२व्या वर्षीही पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. त्या पूर्ण दिवस केवळ दोन कप चहा घेऊन राहतात तरीही दिवसभर उत्साही असतात, प्रवचन देतात, फिरण्यामुळेही त्यांच्या आरोग्याला काही बाधा होत नाही.
  • डॉ. मोदी म्हणतात की, दोन कप चहानंतर १८ ते १९ तासांचा उपवास होतो. हे इंटर मिटेंट फास्टिंग (अधूनमधून खंडित होणारा उपवास) श्रेणीत एक कप चहात जवळपास १५० कॅलरी असतात. म्हणजेच, दोन कप चहातून शरीराला ३०० कॅलरी मिळतात. चहा हा रोगप्रतिकारक प्रणालीला चालना देतो. कॅन्सर आणि हृदयरोगातही संरक्षण देतो. चयापचय चांगले राहते. चहासोबत अन्य केमिकल, कार्बोहायड्रेटने अॅसिडिटी होते, अन्यथा होत नाही. आध्यात्मिक शक्तीनेही सकारात्मक हार्मोन शरीराला ऊर्जा देतात. साध्वीजीनी जो अंगीकार केला आहे त्यामुळे त्यांना भोजनाची आवश्यकता वाटत नाही..
टॅग्स :Jara hatkeजरा हटके