"आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 01:55 PM2021-05-29T13:55:39+5:302021-05-29T14:09:41+5:30

Sadhvi Prachi Slams IMA And Mother Teresa Supports Baba Ramdev : साध्वी प्राची यांनी आयएमएवर जोरदार टीका करतानाच मदर तेरेसा यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केलं आहे.

sadhvi prachi slams ima and mother teresa supports swami ramdev over ima controversy | "आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं"

"आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना केलंय बरं"

Next

नवी दिल्ली - योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी अ‍ॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता या वादामध्ये साध्वी प्राची (Sadhvi Prachi) यांनी उडी घेतली आहे. साध्वी प्राची यांनी आयएमएवर जोरदार टीका करतानाच मदर तेरेसा यांच्याबद्दल देखील वादग्रस्त विधान केलं आहे. साध्वी प्राची यांनी एका व्हिडीओतून आपली भूमिका मांडली आहे. "आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा, बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलंय" असं म्हटलं आहे. 

"आयएमएच्या माध्यमातून 1928 मध्ये एक एनजीओ तयार केली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता" असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. तसेच "बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"भारतात धर्मांतराचा खेळ सुरू असून, केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करावी. माठातील पाण्यामुळे कोणीही आजारी पडत नाही, फ्रीजमधील पाण्याने पडतं. हे आयुर्वेद सांगतं पण परदेशी कंपन्यांचे दलाल याचा विरोध करतात" असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

"रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत"

महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट करून जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"बाबा रामदेव तर योगाचा कोका कोला"; भाजपा नेत्याच्या 'या' पोस्टची रंगली जोरदार चर्चा

बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संजय यांनी बाबा रामदेव यांना "ते योगी नाहीत योगाचे कोका कोला आहेत" असं म्हटलं आहे. पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अ‍ॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे.

"मागील काही दिवसांपासून एक विचित्र स्पर्धा सुरू असल्याचं मला दिसत आहे. प्रत्येक वायफळ गोष्टीवर उत्तर देण्याची काही गरज नसते. तुम्ही फार व्यक्त झाल्यास ज्या व्यक्तीला फार महत्व द्यायची गरज नसते त्याला महत्त्व देता. सध्या आयएमएसुद्धा हेच करत आहे. बाबा रामदेव एक चांगले योगगुरू आहेत मात्र ते योगी नाहीत. योग अभ्यासाबद्दलच्या त्यांच्या ज्ञानासंदर्भात कोणीच प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मात्र आपल्या मेंदूसहीत सर्व अवयवांवर नियंत्रण असणाऱ्या व्यक्तीला योगी म्हणतात. योग अभ्यास आयुष्यात खूप गरजेचा आहे कारण तो तुम्हाला निरोगी ठेवतो. पण योग काही चिकित्सा पद्धत नाही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. हजारो वर्षांपासून आपल्याकडे उपचारांसाठी चरकसंहितेचा आणि सुश्रुतच्या शल्यक्रियेचा वापर करण्यात आला. हे कोण्या योगगुरुने केलेलं नाही" असं संजय यांनी म्हटलं आहे.

Web Title: sadhvi prachi slams ima and mother teresa supports swami ramdev over ima controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.