शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sadabhau Khot: “राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय, पाणी प्रश्न दूर करणार”: सदाभाऊ खोतांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 16:28 IST

Sadabhau Khot: राजस्थानमधील शेतकरी बांधवांनी सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

जयपूर: देशभरातील शेतकरी बांधवांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. अलीकडेच वादग्रस्त केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात असल्याचे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगितले जात आहे. यातच रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी राजस्थानातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, पाणी प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वास सदाभाऊ खोत यांनी दिले. 

राजस्थान येथील किसनपुरा जि.पाली येथे भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला. येथील शेतकरी बांधवांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राजस्थान राज्यातील शेतकरी बांधवांनी अवस्था अत्यंत दयनीय आहे. शेकडो एकर शेती असूनही ती पाणी नसल्यामुळे पिकवू शकत नाहीत. आगामी काळात शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी देण्याबाबत भविष्यात प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सदाभाऊ खोत यांनी जमलेल्या शेतकऱ्यांना दिली.

राजस्थानातील शेतकरी प्रचंड कष्टाळू

राजस्थानधील किसानपुरा येथील शेतकरी मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राजस्थानातील शेतकरी बांधव प्रचंड कष्टाळू आहे. परंतु पाण्याच्या अभावामुळे त्यांना शेती करता येत नाही. येथील शेतकरी बांधवांची एकच मागणी आहे आमच्या शेतीला पाणी द्या. त्या शेतीमधून आम्ही सोने पिकवू. भविष्यात यासाठी निश्चित प्रयत्न करणार असून, त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटना देखील उभारेन, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.  

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Rajasthanराजस्थानFarmerशेतकरीagricultureशेती