दुख:द...! लग्नाच्या वरातीतच नवरदेवाचा झाला मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2017 15:36 IST2017-05-12T15:36:33+5:302017-05-12T15:36:33+5:30
लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक भाग असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नानंतर आयुष्याची नविन सुरुवात करत असतो.

दुख:द...! लग्नाच्या वरातीतच नवरदेवाचा झाला मृत्यू
ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. 12 - लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या गोष्टींपैकी एक भाग असतो. प्रत्येकजण आपल्या लग्नानंतर आयुष्याची नविन सुरुवात करत असतो. पण गुजरातमधील वडोदरामध्ये नव जीवनाची सुरूवात करण्यासाठी निघालेल्या एका तरूणावर काळाने घाला घातला. आपल्या लग्नाच्या वरातीत नाचताना त्याचा दुर्देवी अंत झाला आहे. त्याच्या या अकस्मिक जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील रनोली गावात ऐन वरातीतच 25 वर्षीय सागर सोलंकीचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या वरातीत नवरदेव सागर सोलंकी नाचत होता, यावेळी त्याचा सर्व मित्रपरिवारही जल्लोष साजरा करत होते. सागरच्या मित्रानं त्याला खांद्यावर घेतलं आणि मित्रांसोबत सागरही नाचत होता.
नाचता-नाचता सागरला अचानक चक्कर आली आणि त्यानं मान खाली टाकली. क्षणभर कोणालाही याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मित्राने त्याला खांद्यावरुन खाली उतरवलं. वरातीत नाचणारे इतरही जण त्याच्याकडे धावले, मात्र तो शुद्धीवर नव्हताच. घटनेच गांभिर्य लक्षात घेता त्यावा जवळील रुग्णालयात नेहण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. सागरला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची माहिती आहे.