सचिन क्रिकेटचा देव नाही - सपा खासदाराची सचिनवर आगपाखड
By Admin | Updated: August 11, 2014 15:48 IST2014-08-11T15:48:55+5:302014-08-11T15:48:55+5:30
सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव नाही अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिनला लक्ष्य केले आहे.

सचिन क्रिकेटचा देव नाही - सपा खासदाराची सचिनवर आगपाखड
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११ - राज्यसभेतील अनुपस्थितीमुळे टीकेचा धनी बनलेला खासदार सचिन तेंडुलकरवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव नाही अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी सचिनला लक्ष्य केले आहे.
राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर सचिन वर्षभरात केवळ ३ वेळा हजर राहिला आहे. ही बाब राज्यसभेत चर्चेला आल्यानंतर सचिनवर अनेक खासदारांनी नाराजी वर्तवित टीका केली आहे. आपल्या भावाच्या आजारपणामुळे मला राज्यसभेत येता आले नाही असे स्पष्टीकरण सचिनला द्यावे लागले होते. रजा मिळावी यासाठी सचिनने अर्ज केला आहे. परंतू समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी यावर आक्षेप घेत सचिनवर टीका केली आहे.
सचिन दिल्लीतील विज्ञान भवन मध्ये येवून जातो परंतू राज्यसभेत येत नाही अशी आठवन अग्रवाल यांनी करून दिली. सचिन राज्यसभेत का येत नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. सचिनला अनेक जण क्रिकेटचा देव मानतात पण सचिन क्रिकेटचा देव नाही. देव ही संकल्पना बरोबर नाही त्यामुळे पूजा-पाठ सुरू होईल असे सांगत सचिन हा चांगला फलंदाज आहे असे सांगायलाही नरेश अग्रवाल विसरले नाही. अनेक कारण पुढे करीत बरेच खासदार राज्यसभेत अनुपस्थित राहतात असे सांगत राज्यसभेचे उप-सभापती पी.जी. कुरीयन यांनी सचिनची रजा मंजुर केली आहे.