‘सचिनला ‘भारतरत्न’ने गौरविणो हा देशाचा अपमान’

By Admin | Updated: August 10, 2014 03:26 IST2014-08-10T03:26:54+5:302014-08-10T03:26:54+5:30

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा ‘भारतरत्न’ने गौरव करणो आणि अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेचे सदस्य बनविणो हा देशाचा अपमान आहे, अशी जोरदार टीका मरकडेय काटजू यांनी केली आहे

'Sachin honors Bharat Ratna' | ‘सचिनला ‘भारतरत्न’ने गौरविणो हा देशाचा अपमान’

‘सचिनला ‘भारतरत्न’ने गौरविणो हा देशाचा अपमान’

>नवी दिल्ली : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा ‘भारतरत्न’ने गौरव करणो आणि अभिनेत्री रेखा यांना राज्यसभेचे सदस्य बनविणो हा देशाचा अपमान आहे, अशी जोरदार टीका प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केली आहे. शनिवारी त्यांनी टि¦टरवर ही टीका केली.
तेंडुलकर आणि रेखा हे एप्रिल 2क्12 मध्ये राज्यसभा सदस्य झाले. तेंडुलकर केवळ 3 वेळा, तर रेखा 7 वेळा सभागृहात उपस्थित होत्या. सभागृहात सततच्या गैरहजेरीमुळे या दोघांवर त्यांच्या सहसदस्यांकडून व समाजातूनही टीका होत आहे. या दोघांची गैरहजेरी ही अजिबात मान्य होणारी नसल्याचे राज्यसभेच्या अन्य सदस्यांचे म्हणणो आहे.
राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य विनापरवानगी 6क् दिवस गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व रिक्त झाल्याचे सभागृह जाहीर करू शकते. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांच्या म्हणण्यानुसार सचिन तेंडुलकर व रेखा हे परवानगी न घेता 6क् दिवस गैरहजर राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांनी कोणताही नियमभंग केलेला नाही.

Web Title: 'Sachin honors Bharat Ratna'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.