महान फलंदाजांच्या यादीत सचिन-धोनीला नामांकन

By Admin | Updated: March 7, 2015 01:47 IST2015-03-07T01:47:57+5:302015-03-07T01:47:57+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे नाव सर्वकालीन महान वन डे क्रिकेटसाठी नामांकित केले गेले आहे.

Sachin-Dhoni nominated in the list of great batsmen | महान फलंदाजांच्या यादीत सचिन-धोनीला नामांकन

महान फलंदाजांच्या यादीत सचिन-धोनीला नामांकन

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे नाव सर्वकालीन महान वन डे क्रिकेटसाठी नामांकित केले गेले आहे. ‘क्रिकेट मंथली’ या पुरस्कारासाठी सचिन व धोनी यांच्यासह आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम आक्रम व वेस्टइंडीजचा महान क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासुद्धा नावाचा समावेश मानांकन यादीत आहे.
या नावांतून विजेत्याची निवड एक ज्युरी करेल, ज्यामध्ये ५० खेळाडू, समालोचक आणि जगभरातील क्रिकेट लेखक आहेत. याची घोषणा पुढील आठवड्यात होईल.
(वृत्तसंस्था)

Web Title: Sachin-Dhoni nominated in the list of great batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.